घरताज्या घडामोडीVijay Diwas 2021: भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करुन दिलं बांगलादेशला स्वातंत्र्य, ९३...

Vijay Diwas 2021: भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करुन दिलं बांगलादेशला स्वातंत्र्य, ९३ हजार सैनिकांनी पत्करली शरणागती

Subscribe

देशात १६ डिसेंबर २०२१ रोजी विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारताने याच दिवशी पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांग्लादेशला स्वातंत्र्य केलं आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे करुन पूर्व पाकिस्तानला स्वातंत्र्य दिलं होते. हाच पूर्व पाकिस्तान आजचा बांग्लादेश म्हणून ओळखला जातो. आजचा विजय दिवस मुक्तिसंग्रामचा सुवर्ण महोत्सव आहे. बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मुक्ती वाहिनी पाकिस्तानशी संघर्ष करत होते. या मुक्ती वाहिनीला लढ्यासाठी भारतात प्रशिक्षण देण्यात आल्याचे उघड झाले होते. पंरतु पाकिस्तानचा थेट भारताशी संघर्ष नव्हता. पाकिस्तानने भारताविरुद्ध ऑपरेशन चंगेज खान सुरु केल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. या युद्धादरम्याच्या १४ दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानला चांगलेच नमवले होते. पाकिस्तानचे दोन तुकडे करुन भारताने बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. तो दिवस १६ डिसेंबर १९७१चा होता त्यामुळे भारतात हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

भारताकडून पाकिस्तानचे दोन तुकडे करण्यात आले. यामुळे बांग्लादेश स्वातंत्र्य झाला. आज ५० वा विजय दिवस देशात साजरा करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून भारताविरोधात ऑपरेशन चंगेज खान सुरु करत देशाच्या पश्चिम सीमेवर हल्ला केला होता. याला भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्याने युद्धादरम्यान ढाक्याला चारही बाजूंनी वेढले होते. भारताच्या ३ हजार सैन्याने पाकिस्तानच्या ९३ हजार सैन्याभोवती घेराव घातला. सैन्य मृत्यूच्या तावडीत सापडल्यामुळे भारतासमोर आत्मसमर्पण करण्याशिवाय पाकिस्तानच्या जनरल नियाजींकडे कोणताही पर्याय नव्हता. पाकिस्तानचे आत्मसमर्पण स्वीकारण्यासाठी जनरल जेएफआर जेकब यांना पाठवण्यात आले होते. जेकब यांना १६ डिसेंबरच्या पहाटे भारतीय लष्करप्रमुख मॉनेक शॉ यांनी फोन करुन ढाक्याला जाण्यास सांगितले होते.

- Advertisement -

भारताचे जनरल जेएफआर जेकब ढाक्याला पोहोचले तेव्हा युद्ध सुरुच होते. दोन्ही ठिकाणांहून गोळीबार सुरु होता. मात्र पाकिस्तानी जनरल नियाजी यांची भेट झाल्यानंतर जेकब यांनी आत्मसमर्पणाचा खलिता वाचून दाखवला. यावर कोण म्हणाले आम्ही आत्मसमर्पण करतो आहे असे म्हणत जनरल नियाजी संतप्त झाले होते.

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सैन्याला वेढा घातला होता. यामुळे पाकिस्तानच्या सैन्याच्या सुरक्षेची हमी आत्मसमर्पण केल्यावर घेण्यात येईल असे खडेबोल भारताचे जनरल जेकब यांनी पाकिस्तानचे जनरल नियाजी यांना सुनावले. आत्मसमर्पण करा नाहीतर परिणामांना समोरे जाण्याची तयारी ठेवा असे म्हटल्यावरही जनरल नियाजी काही आत्मसमर्पण करण्यासाठी तयार नव्हते. दोन्ही जनरलमध्ये चर्चा झाली. पाकिस्तानचे जनरल नियाजी यांना अर्धा तास विचार करण्यासाठी वेळ देण्यात आला यानंतर जेकब यांनी नियाजींना ३ वेळा आत्मसमर्पणाविषयी विचारले परंतु कोणतेही उत्तर मिळाले नाही.

- Advertisement -

भारताचे जनरल जेकब यांनी जनरल नियाजींना विचारल्यानंतर कोणतेही उत्तर आले नाही. यामुळे नियाजींची मुकसंमती असल्याचे समजत ढाका रेसकोर्स मैदानात बैठक व्यवस्था केली. यावेळी भारताचे मेजर जनरल जगजीत सिंह अरोरासुद्धा पोहोचले होते. यामुळे आता पाकिस्तान समोर आत्मसमर्पण करण्याशिवाय पर्याय नव्हता. यामुळेच पाकिस्तानचे जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाजी यांनी ९३, हजार सैनिकांसोबत भारतासमोर आत्मसमर्पण केलं होते. भारताने केवळ १४ दिवसांमध्ये हे युद्ध जिंकले होते आणि बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले.


हेही वाचा :  एमकेसीएल, आयबीपीएस किंवा टीसीएस घेणार सरकारी परीक्षा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -