घरमहाराष्ट्रएमकेसीएल, आयबीपीएस किंवा टीसीएस घेणार सरकारी परीक्षा

एमकेसीएल, आयबीपीएस किंवा टीसीएस घेणार सरकारी परीक्षा

Subscribe

गेल्या काही दिवसांत शासकीय अनेक परीक्षांमध्ये पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत. आधी लातूरमध्ये आरोग्य विभागाच्या पेपरफुटीनंतर म्हाडा परीक्षांची पेपरफुटीही समोर आली. ज्यामुळे आता असा गोंधळ टाळण्यासाठी राज्य सरकारने या परीक्षा घेण्याकरता काही कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे यापुढे राज्यातील शासकीय विभागांमार्फत होणार्‍या परीक्षा यापुढील काळात एमकेसीएल (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड), आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल) किंवा टीसीएस (टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस) या संस्थांच्या माध्यमातूनच घेण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

या महत्वाच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अनुमती दर्शविली आहे. याआधी 2014 मध्ये सुद्धा या संस्थांच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येत होत्या. मात्र, सरकार बदलल्यानंतर हे कंत्राटही बदलण्यात आले होते. पण आता महाविकास आघाडीने आपला निर्णय बदलला आहे.

- Advertisement -

अलिकडेच झालेल्या पेपरफुटीमुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला होता. या पेपरफुटीनंतर राज्य सरकारवर म्हाडाच्या परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. या पेपरफुटीच्या प्रकरणात राज्य सरकारकडून काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. या पेपटफुटीची सध्या चौकशी सुरू आहे. यात आणखी काही महत्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. यात पोलिसांनी काही संभाषणेही तपासली आहेत.

याआधीही अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अनेक विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्याचेही आपण पाहिले होते. त्यानंतर आरोग्य विभागाचे पेपर फुटल्याने कित्येक वेळा परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. पेपरफुटीच्या घटनांमुळे अनेकदा परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड नुकसानाला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने, बुधवारी अखेर राज्य शासनाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर इथून पुढे सर्व परीक्षा एमकेसीएल, आयबीपीएस आणि टीसीएस घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -