घरदेश-विदेशDominican Republic Plane Crash: डोमिनिकन रिपब्लिकमध्ये भीषण विमान अपघात; ९ जणांचा मृत्यू

Dominican Republic Plane Crash: डोमिनिकन रिपब्लिकमध्ये भीषण विमान अपघात; ९ जणांचा मृत्यू

Subscribe

डोमनिकन रिपब्लिकनची राजधानी सँटो डोमिंगोमध्ये एक भीषण विमान अपघात घडला आहे. विमानाचे ऑपरेटर हेलिडोसा एव्हिएशन ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री लास अमेरिका विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगदरम्यान हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ९ लोकांमध्ये सात प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्सचा समावेश होता. यात प्रवाशांपैकी सहा प्रवासी हे परदेशी नागरिक होते तर एक डेमिनिकनचा प्रवासी होता. मात्र या मृत प्रवशांची नाव अद्याप समजू शकलेली नाहीत. तसेच मृत्युमुखी पडलेले परदेशी हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत, याची माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

Flightradar 24 नुसार, अपघातग्रस्त विमान हे डोमिनिकन रिपब्लिकमधील ला इसाबेला आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फ्लोरिडाच्या दिशेने जात होते. मात्र टेकऑफच्या अवघ्या १५ मिनिटांतच ते कोसळले. मात्र, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -