घरताज्या घडामोडीआगामी यूपी विधानसभा निवडणुकीत ३००हून अधिक जागा जिंकू, अमित शहांचा दावा

आगामी यूपी विधानसभा निवडणुकीत ३००हून अधिक जागा जिंकू, अमित शहांचा दावा

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज(शुक्रवार) लखनऊमध्ये सरकार बनाओ, अधिकार पाओ, या बोधवाक्याखाली रॅलीज आयोजन करण्यात आलं आहे. त्यावेळी त्यांनी रॅलीमध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांना संबोधित केलं. दरम्यान, आगामी यूपी विधानसभा निवडणुकीत ३००हून अधिक जागा जिंकू, असा दावा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला आहे. तसेच सपा, बसपा आणि काँग्रेस या पक्षांवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

आम्ही २०२२ मध्ये यूपी विधानसभा निवडणुकीत ३०० हून अधिक जागेवर जिंकून येऊ. सपा, बसपा आणि काँग्रेसने अनेक वर्षांपर्यंत देश आणि उत्तर प्रदेशमध्ये राज्य केलं आहे. परंतु गरीबांच्या घरात अद्यापही गॅस सिलिंडर घरात पोहोचले नाहीयेत. तसेच शौचालय सुद्दा बांधण्यात आलेले नाहीयेत. असं अमित शहा म्हणाले.

- Advertisement -

सपा, बसपा आणि काँग्रेसने तुम्हाला काय दिलं?

आम्ही तुम्हा सर्वांना विचारतो की, सपा, बसपा आणि काँग्रेसने देशात आणि प्रदेशात अनेक वर्ष राज्य केलं. परंतु तुम्हाला काय दिलं? मोदी सरकारने गरीबांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा केला असून गॅस, शौचालय, घर, आणि अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्या प्रदेशात गुंड्यांच राज्य असतं. तिथे गरिबांचा विकास कधीच होत नाही. गरिबांचा विकास तेव्हाच होतो. जेव्हा कायद्याचं राज्य असतं. सपा-बसपा असे सरकार फक्त माफियांना संरक्षण देतात.

उत्तर प्रदेशात सपा, बसपाचं सरकार आहे. परंतु त्यांनी आपल्या भल्यासाठी आणि जिंकण्यासाठीच फक्त काम केलं आहे. मागासवर्गीय जातींसाठी  नरेंद्र मोदींनी काम केलं आहे. अनेक वर्षांपासून मंत्रालय बनवण्यासाठी आम्ही मागणी केली. परंतु २०१९ मध्ये मोदींनी मागासवर्गीय जातीसाठी एक वेगळं मंत्रालय बनवून दिलं आहे. तसेच मोदी सरकारने देशभरात ३ कोटींपेक्षा अधिक मत्स्य पालन विभागासाठी मत्स्य मंत्रालयाचं गठन केलं आहे. असं अमित शहा म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकतर्फी विजय भाजपचा होणार, नारायण राणेंचा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -