घरताज्या घडामोडीसिद्धू भेट आणि ९ दिवसांनी क्रिकेटचा संन्यास, हरभजनची राजकारणाच्या मैदानावर एन्ट्री

सिद्धू भेट आणि ९ दिवसांनी क्रिकेटचा संन्यास, हरभजनची राजकारणाच्या मैदानावर एन्ट्री

Subscribe

दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे भज्जीने २३ वर्षाच्या करियरला असा अचानक अलविदा का केला असावा यावर आता तर्क वितर्क लढवले जात आहेत. याचदरम्यान हरभजन आता राजकारणाच्या पिचवर एन्ट्री करत असल्याचे वृ्त्त आहे.

काही दिवसांपूर्वी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. त्यात सिद्धू आणि हरभजन एकत्र होते. या फोटोखाली कॅप्शन होती की हा फोटो शक्यतांनी भरलेला आहे… या ओळीमागे अनेक अर्थ दडलेले असल्याने क्रिकेटचे मैदान गाजवणारा भज्जी लवकरच राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले होते.

- Advertisement -

तर राजकिय जाणकारांनी देखील हरभजन राजकारणात येण्याच्या शक्यतेवर शिकामोर्तब केले होते. काँग्रेस हरभजनला आगामी जालंधर विधानसभा निवडणूकीत उतरवण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात आले होते. यादरम्यान काँग्रेसचे अनेक नेते हरभजनच्या संपर्कातही होते. मात्र हरभजनने राजकारणात जाण्याचा आपला विचार नसल्याचे सांगत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण त्यानंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धू यांच्याबरोबरील फोटोमुळे हरभजन राजकारणात जाणार या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

विशेष म्हणजे सिद्धू बरोबरील फोटो व्हायरल झाल्यानंतर नवव्याच दिवशी हरभजनने क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे क्रिकेटच्या मैदानातून संन्यास घेणारा भज्जी येणाऱ्या काही दिवसात नेत्याच्या रुपात  राजकारणाच्या मैदानात विरोधकांच्या विकेट्स कशा काढतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे.

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -