घरटेक-वेकऐकावं ते नवलच! आता AI मशीन घेणार आरोपींचा शोध अन् ठोठावणार शिक्षा

ऐकावं ते नवलच! आता AI मशीन घेणार आरोपींचा शोध अन् ठोठावणार शिक्षा

Subscribe

विविध गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी अनेक देशांमध्ये विविध कायदे आहेत. मात्र आता टेक्नॉलॉजीच्या युगात गुन्हेगारही हायटेक होत आहेत. त्यामुळे या हायटेक गुन्हेगारांना पकडण्यात सध्याचे कायदेही अपुरे पडत आहेत. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यातून वाचणाऱ्या आरोपींना आता एक हायटेक मशीनच्या माध्यमातून शोधले जाणार आहे. चीनमधील हायटेक कंपनी आता जगातील पहिला आर्टिफिशिअल इंटेलिजेंस पावर्ड प्रॉसेक्यूटर तयार करत आहे.

ही एक अशी प्रॉसेक्यूटर मशीन आहे जी विविध युक्तिवाद आणि वादविवादांच्या आधारे योग्य आरोपीला किंवा गुन्हेगाराला ओळखत कोर्टात शिक्षेची मागणी करेल. यामुळे योग्य गुन्हेगाराचा शोध घेण्यास पोलिसांनाही मदत मिळणार आहे. या मशीनने आत्तापर्यंत ९७ टक्के योग्य निकाल दिल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

शंघाई पुडोंग पीपुल्स प्रोक्युरेटोरेट कंपनी या मशीनची निर्मिती करत आहे. AI प्रॉसेक्यूटर असे या मशीनचे नाव आहे. या मशीनच्या निर्मात्यांनी सांगितले की, ही मशीन अभ्यासकांच्या कामाचा भार हलका करण्यास मदत करणार आहे.

कोर्टात वकील नाही तर मशीन लढवणार केस

डेस्कटॉप कम्प्यूटरवर या प्रॉसेक्यूटर मशीनचा वापर करता येतो. यातील सिस्टममध्ये अरबोंचा डेटा स्टोर केला जाऊ शकते.  विश्लषेणाच्या आधारे ही मशीन विविध युक्तिवाद करण्यास सक्षम आहे. त्यामुळे पोलीस आणि सरकारी वकीलांचे काम ही मशीन करणार आहे. म्हणजेच काय तर प्रॉसेक्यूटर मशीन संबंधीत केसच्या डेटाच्या आधारे योग्य आरोपांची ओळख पटवत त्याला न्यायाधिशासमोर हजर करत शिक्षेची मागणी करणार आहे.

- Advertisement -

एका रिपोर्टनुसार, या AI मशीनच्या निर्मितीसाठी २०१५ ते २०२० पर्यंतच्या हजारो लीगल केसेसचा अभ्यास करण्यात आला. यात घातक ड्राइवर्स, क्रेडिट कार्डसंबंधीत फसवणूक, चोरी आणि जुगाराच्या प्रकरणांचे विश्लेषण करत योग्य आरोपींचा शोध घेतला.

चुकीचा निर्णय दिला जाण्याची भीती

साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या माहितीनुसार, एका चीनी न्यायाधिशांनी सांगितले की, ९७ टक्के प्रकरणांचा योग्य देणारी मशीनच असल्याने काही वेळा चुकीचा निर्णय देण्याची शक्यता आहे.

जबाबदारी कोणाची असेल?

यावर न्यायाधिशांनी पुढे म्हटले की, जर या मशीनमधून आरोपी समजून एखाद्या चुकीच्या व्यक्तीस शिक्षा झाली तर याची जबाबदारी कोणाची असेल? न्यायाधिश, मशीन की अलगोरिदम डिझायनर्सची? ही मशीन योग्य आरोपीचा शोध तर घेईल परंतु मनुष्याच्या जागी एका मशीनला बसवणे योग्य नाही असे मत न्यायाधिशांनी व्यक्त केले.


महात्मा गांधींना शिवीगाळ केल्याचा पश्चाताप नाही, कालीचरण महाराजांनी केला नवा वादग्रस्त व्हिडीओ शेअर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -