घरमनोरंजनबोल्ड नाही तर साध्या लुकमुळे 'ही' अभिनेत्री आहे फॅन्सची लाडकी

बोल्ड नाही तर साध्या लुकमुळे ‘ही’ अभिनेत्री आहे फॅन्सची लाडकी

Subscribe

दाक्षिणात्य (South Movie)सिनेमाची क्रेझ इतर राज्यातही प्रचंड वाढली आहे. प्रेक्षकांचा वाढता कल पाहता अनेक दाक्षिणात्य मेकर्स सिनेमा हिंदीमध्ये देखील बनवू लागले आहेत. नुकतंच ‘श्याम सिंघा रॉय’ हा सिनेमा 24 डिसेंबर रोजी थिएटर्समध्ये दाखल झाला. सिनेमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. यासह बॉक्स ऑफिसवरही सिनेमाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. सिनेमाच्या मेकर्सने सक्सेस पार्टीचे आयोजन केलं होतं या पार्टीला सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टने हजेरी लावली होती. या हायप्रोफाईल पार्टी दरम्यान सर्वाधिक लक्षवेधी अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) दिसत होती.(Sai Pallavi traditional Look )

बॉलिवूड इंडस्ट्री असो किंवा साऊथ इंडस्ट्री या झगमगत्या दुनियेमध्ये प्रत्येकजण स्टाईलिश राहण्याचा, दिसण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक कलाकार वेस्टर्न स्टाईल कॅरी करण्यास जास्त प्राधान्य देतात. यामुळे त्या अगदी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागतात. मात्र अभिनेत्री साई पल्लवी याला अपवाद ठरलीये. साईच्या बोल्ड लुकमुळे नाही तर तिच्या साध्या गेटपवर चाहते फिदा असल्याचं दिसतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai)

- Advertisement -

साई पल्लवीने या पार्टीदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये ती लाल रंगाच्या सुंदर ट्रेडिशनल लुकमध्ये दिसतेय. तिच्या स्माईलवरतर नेटकरी प्रचंड फिदा झाले आहेत. साई पल्लवीला फारश्या मेकअपची देखील आवड नाहीये अगदी साधा आणि सुंदर मेकअप करण्याचा तिचा कल असतो. साईने अनेक सुपरहीट सिनेमात काम केलंय मात्र आपल्या व्यक्तीगत आयुष्य तिला साधेपणाने जगण्यास मजा येते असं तिने अनेकदा म्हंटल आहे.

- Advertisement -

हे हि वाचा –  दिशा पटानीचा बिकनीत जलवा, बोल्ड लूकने चाहते घायाळ

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -