घरCORONA UPDATEOmicron Variant : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव! मुंबई, दिल्लीत एक दिवसात रुग्णसंख्या...

Omicron Variant : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव! मुंबई, दिल्लीत एक दिवसात रुग्णसंख्या झाली दुप्पट

Subscribe

देशात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यात ओमिक्रॉन या नव्या विषाणूने आव्हान आणखी वाढवले आहे. यामुळे मायनगरी मुंबई आणि राजधानी दिल्लीत कोरोनाने पुन्हा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. एका दिवसांत या दोन्ही राज्यातील रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत एका दिवसात जवळपास २५१० नवीन रुग्ण आढळले आहेत. यात धारावीत जवळपास १७ रुग्ण आढळलेत. अचानक वाढलेल्या या रुग्णसंख्येमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता अधिक तीव्र होत आहे.

मुंबईत पुन्हा कोरोनाचे सावट

देशातील दोन मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने होणारी वाढ भयावह आहे. यात मुंबईत बुधवारी १३७७ जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर आज हा आकडा थेट २५१० वर पोहोचला आहे. त्याच वेळी, बुधवारी महाराष्ट्रात कोविड-19 चे ३९०० नवीन रुग्ण आढळले, तर आणखी २० रुग्णांचा मृत्यू झाला. संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची ८५ रुग्ण आहेत. त्यामुळे जितक्या वेगाने ही रुग्णसंख्या वाढतेय तितक्या वेगाने त्यावर नियंत्रण मिळवणे प्रशासनास अवघड जाऊ शकते. यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. तसेच रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत.

- Advertisement -

दिल्लीत संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध

दरम्यान, संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी दोन्ही शहरांमध्ये अनेक निर्बंध लादले जात आहेत. यात दिल्लीत रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी राजधानीत ‘यलो अलर्ट’ जाहीर केला. ज्याअंतर्गत शाळा, महाविद्यालये, सिनेमा आणि जिम पुन्हा बंद करण्याचे आदेशात दिले आहेत. तर दिल्ली मेट्रो फक्त ५० टक्के आसन क्षमतेने धावेल तर ऑटो, रिक्षा आणि कॅबमध्ये दोन प्रवासी बसू शकतात. दिल्लीत ७० टक्क्यांपर्यंत रुग्णसंख्या वाढली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -