घरताज्या घडामोडीomicron- ओमीक्रॉनचा हाहाकार, अन्नपाण्याविणा लोकांचे हाल

omicron- ओमीक्रॉनचा हाहाकार, अन्नपाण्याविणा लोकांचे हाल

Subscribe

कोरोना व्हायरसचा नवीन वेरिंयट ओमीक्रॉनने जगभरात धुमाकूळ घातला असून चीनमधील जियान शहरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार २९ डिसेंबरला चीनमध्ये १५६ लोकांना ओमीक्रॉनचा संसर्ग झाला. यातील १५५ नागरिक जियान क्षेत्रातील आहेत. तर ५१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ९ डिसेंबरपासून आतापर्यंत या क्षेत्रात १,११७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

वॉशिंग्टन टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. त्यानुसार कोरोना संशयितांचा आकडा वाढत असल्याने ३० डिसेंबरला या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या करण्यात आल्या.  यावेळी  १५५ जणांना ओमीक्रानची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर या क्षेत्रात निर्बंध घालण्यात आले. नागरिकांना सार्वजनिक स्थळांवर जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. जियान येथे ओमीक्रोन रुग्ण वाढत असल्याने आठ दिवसांपूर्वी लॉकडाऊन करण्यात आला आहे. १३ कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात लॉकडाऊन लागू करण्याबरोबरच लोकांना घराबाहेर पडण्यासही मनाई करण्यात आली आहे. तसेच जर एखादी गाडी जरी रस्त्यावर दिसली तरी मालकाची रवानगी दहा दिवसांसाठी थेट जेलमध्ये करण्यात येत आहे. तसेच त्याच्याकडून दंडही आकारला जात आहे.

- Advertisement -

नागरिकांना घराबाहेर पडण्यासच मनाई करण्यात आल्याने दैनंदिन सामान घेण्यासाठीही लोक घराबाहेर पडू शकत नाहीयेत. तसेच त्यांना सरकारकडून घरातील आवश्यक सामान आणून देण्यासाठी सरकारने कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे जियान शहरातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -