२०२२ वर्षाची आनंदात सुरुवात झाली आहे. बॉलिवूडकरांनी देखील नव्या वर्षाचं जंगी स्वागत केले. सेलिब्रेटींनी आपल्या जवळच्या माणसांसोबत नव्या वर्षाचं स्वागत केले. भाईजान सलमान देखील त्याचे नवीन वर्ष गर्लफ्रेंड यूलिया वंतूर आणि तिच्या कुटुंबासोबत साजरे केले. अभिनेत्री राजकारणी असलेल्या काक बीना यांनी सलमान खान सोबतचा फोटो शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. यूलिया सोबत संगीता बिजलानी देखील सलमानच्या न्यू इअर सेलिब्रेशनमध्ये होते.
ब्लॅक टी शर्ट आणि व्हाइट प्रिंटेट जॅकेट, वॉश्ड डेनिममध्ये न्यू इअर पार्टीत सलमानचा स्वॅग पहायला मिळतोय. काक बीना यांनी शेअर केलेला फोटोत सलमान फार खूश दिसत आहे. काक बीना आणि सलमानला फॅन्सनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे यूलिया वंतूरने देखील न्यू इअर सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात तिने तिच्या फॅन्सना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. व्हिडिओमध्ये काक बीना आणि संगीता बिजलानी दिसत आहे. या व्हिडिओत सलमान खान कुठेही दिसला नाही.
View this post on Instagram
सलमान खान यूलिया आणि सर्व कुटुंबाने सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर मोठ्या धूमधडाक्यात न्यू इअर सेलिब्रेशन केले. त्यांच्या सेलिब्रेशनच्या व्हिडिओ आणि फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सलमानने त्याचा ५६ वा वाढदिवसही त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर सेलिब्रेट केला होता.
वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलल्या सलमानला वाढदिवसाच्या आधी पनवेलच्या फार्महाऊसवर सापाने दंश केला. साप बिनविषारी असल्याने सलमान थोडक्यात वाचला. मात्र तरीही ६ तास सलमान डॉक्टरांच्या देखरेखीखाली होता. आता सलमान पूर्णपणे ठिक आहे.
View this post on Instagram
माझ्या पनवेलच्या फार्महाऊसमध्ये एक साप शिरला होता.मी त्याला एका काठीच्या मदतीने बाहेर नेले.मात्र थोड्यावेळाने तो माझ्या हाताजवळ येऊ लागला.त्यानंतर मी त्या सापाला फार्महाऊसच्या बाहेर सोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्याने मला तीन वेळा दंश केला. या सर्पदंशाच्या उपचारासाठी मी ६ तास रुग्णालयात दाखल होतो.आता माझी प्रकृती ठीक आहे, अशी माहिती अभिनेता सलमान खानने दिली आहे.
हेही वाचा – सलमान खानला ३ वेळा सर्पदंश; ‘Birthday’ च्या दिवशीच सांगितले किस्से