घरताज्या घडामोडीRaigad : पोलीस दलातील श्वान ठरला 'हिरो' ; 'ऑस्कर'ने 48 तासात केला...

Raigad : पोलीस दलातील श्वान ठरला ‘हिरो’ ; ‘ऑस्कर’ने 48 तासात केला हत्येचा उलगडा

Subscribe

ऑस्करसोबत इतर सहाही श्वान हे आपली कामगिरी चोख बजावत आहेत. रायगड पोलीस याच्या खांद्याला खांदा लावून पोलीस दलात मर्फी, ऑस्कर, रॉकी, मॅक्स, ब्रुनो, रुफस, डस्टी हे श्वान आपली सेवा देत आहेत.

रायगड पोलिस दलातील ऑक्सर या श्वानाने महाड येथील सरपंच महिला खून प्रकरणात आणि वडखळ येथील एका हत्येप्रकरणात महत्वाची भुमिका बजावली असून दोन्ही गुन्ह्याचा शोध पोलिसांनी काही तासातच लावून आरोपींना जेरबंद केले आहे.ऑस्करसोबत इतर सहाही श्वान हे आपली कामगिरी चोख बजावत आहेत. रायगड पोलीस याच्या खांद्याला खांदा लावून पोलीस दलात मर्फी, ऑस्कर, रॉकी, मॅक्स, ब्रुनो, रुफस, डस्टी हे श्वान आपली सेवा देत आहेत. सातपैकी एक असलेला ऑस्कर श्वान याने जिल्ह्यातील वडखळ आणि महाड येथील हत्येप्रकरणात महत्वाची भुमिका बजावली आहे.त्याचबरोबर त्याने घरफोडीचे गुन्हे शोधण्यास मदत केलेली आहे. ऑस्करचा जन्म १२ मार्च २०१९ रोजी झाला असून, डॉबर जातीचा हा श्वान आहे. २०२० साली ऑस्कर हा पोलिस दलात डॉग स्कॉड पथकात कार्यरत झालेला आहे. डॉग स्कॉडचे मंगेश निगडे आणि निमेश माळवी हे दोन हँडलर पोलिस कर्मचार्यांनी ऑस्करला प्रशिक्षित केले आहे.


हेही वाचा – MHADA, MPSC Exam : म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -