घरताज्या घडामोडीआशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल

आशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल

Subscribe

पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई"करां"ची आठवण झाली - आशिष शेलार

भाजप आमदार आशिष शेलार यांच्या खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ लाख टाकल्यामुळे त्यांच्यात प्रश्न विचारायला नैतिक धैर्य आलं असल्याचा खोचक टोला काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी लगावला आहे. मुंबई महानगरपालिका आणि महाविकास आघाडीकडून नागरिकांना ५००चौ.फु. घरांचा मालमत्ता कर माफ केला आहे. यावर आशिष शेलारांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखे पासून ५००चौ.फु. घरांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करा असे शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबईकरांची आठवण झाली असल्याची टीका शेलारांनी केली आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनांवर शेलारांनी वक्तव्य केलं आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना बिल्डरांना प्रिमियममध्ये ११ हजार कोटींची सुट दिली होती. पब बार आणि हॉटेल्सच्या लायसन्स फी मध्ये सवलत देण्यात आली आहे. मद्यावरील करात सुट देण्यात आली आहे. तसेच आता ज्यातारखेला वचन दिले आहे तेव्हापासून ५०० चौ.फु घरांचा मालमत्ता कर माफ करा अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच ५०० चौ.फु पर्यंतच्या दुकानदारांनाही सुट देणारा का? असा सवाल आशिष शेलारांनी केला आहे.

- Advertisement -

भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सावंत यांनी सवाल उपस्थित करत शेलारांना खोचक टोला लगावला आहे. ‘शेलारांच्या अकाऊंटमध्ये मोदींनी १५ लाख टाकले वाटते? असे प्रश्न विचारायला नैतिक धैर्य कदाचित त्यामुळेच आले असेल’ असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला १५ लाख रुपये खात्यात जमा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. यावरुन सचिन सावंत यांनी आशिष शेलारांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

आशिष शेलार काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५०० चौ.फु घरांच्या मालमत्ता करात सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये ११ हजार कोटींची सुट दिलीत, बार,पब,रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत, विदेशी दारुला करात ५०% सुट दिलीत, वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली. आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत. तसेच आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखे पासून ५००चौ.फु. घरांचा मालमत्ता कर पुर्ण माफ करा, अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं ५०० चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही ५००चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा? आणि ५००चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का? असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.


हेही वाचा : भाजपने सिंधुदुर्ग बँक निवडणुकीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा स्वाद घेतला, शिवसेनेचा पलटवार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -