घरक्रीडाInd vs SA 2nd Test : लॉर्ड शार्दुलचा 'ठाकुरी' बाणा, दक्षिण आफ्रिकेचा...

Ind vs SA 2nd Test : लॉर्ड शार्दुलचा ‘ठाकुरी’ बाणा, दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ केला गारद

Subscribe

दक्षिण आफ्रिका २२९ धावांवर ऑलआऊट

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्याच दिवशीच दक्षिण आफ्रिकेचाही डाव २२९ डावांवर गडगडला. जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या कसोटीत दुसऱ्या सत्रातच दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑलआऊट झाला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात भारतापेक्षा २७ धावांची आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात २०२ धावा केल्या होत्या. भारताकडून शार्दुल ठाकुरने सर्वाधिक अशा ७ विकेट्स घेत भेदक गोलंदाजी केली.

दक्षिण आफ्रिकेच्या संघातील सात विकेट्स या शार्दुल ठाकुरने घेतल्या. आपल्या १७ ओव्हरमध्ये ६१ धावा देत ७ विकेट्स घेण्याची किमया शार्दुल ठाकुरने केली. या स्पेलमध्ये शार्दुलने तीन निर्धाव षटकेही टाकली. शार्दुल ठाकुरच्या भेदक गोलंदाजीमुळेच दक्षिण आफ्रिकेला सुरूवातीला चांगला लय सापडूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून इतर गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीने २ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहच्या खात्यात १ विकेट आली.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिका २२८ धावांमध्ये ऑल आऊट

दक्षिण आफ्रिकेने ८७ धावंवर एक विकेट गमावत पहिल्याच दिवशी डाव सावरला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच यजमान संघाने तीन विकेट्स गमवल्या. या सगळ्या विकेट्स शार्दुल ठाकुरच्या खात्यात गेल्या. त्यामुळेच १०२ धावांवर ४ विकेट्स अशी स्थिती लंचपर्यंत झाली. लागोपाठ तीन विकेट्स गमावत दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत आला. पण सत्रातील पहिल्या विकेटसाठी मात्र भारतीय संघाला खूपच वाट पहावी लागली. शार्दुल ठाकुरने कॅप्टनने डी एल्गरला २८ धावांच्या स्कोअरवर पंतच्या हाते कॅचआऊट केले. एल्गरने १२० धावांचा सामना करत ४ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. त्यानंतर शार्दगुल ठाकुरने पीटरसनला ६२ धावांवर मयंक अग्रवालच्या हस्ते झेलबाद केले. त्यापाठोपाठच १ धावेवर डुसेनला बाद करत शार्दुल ठाकुरने चौथा झटका दिला. त्याआधी पहिल्या दिवशी खराब प्रकाशामुळे ८१.१ षटकांचाच खेळ होऊ शकला होता.

तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका हा जसप्रीत बुमराहने दिला. बुमराहने केशव महाराजला २१ धावांवर बोल्ड केले. त्यानंतर शार्दुल ठाकुरने मार्को जेन्सनला २१ धावांवर बाद करत आफ्रिकेला नववा झटका दिला. त्यानंतर लुंगी एनगिडीला शून्य धावांवर पंतच्या माध्यमातून झेलबाद केले. तर ओलिवियर १ धावांवर नाबाद झाला.

- Advertisement -

U-19 World Cup: झिम्बाब्वेच्या चार खेळाडूंना कोरोनाची लागण

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -