घरताज्या घडामोडीसहकार विभागाची  कारवाई सूडबुध्दीने, प्रवीण दरेकरांचा आरोप

सहकार विभागाची  कारवाई सूडबुध्दीने, प्रवीण दरेकरांचा आरोप

Subscribe

कारवाई विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार.सहकार विभागाकडून दरवर्षी  तपासणी होत असते. मग त्यावेळी राज्य सरकार आणि सहकार विभाग झोपले होते काय? 

मुंबै बँकेचे संचालक म्हणून आपल्याला अपात्र ठरविण्याची सहकार विभागाची  कारवाई सूडबुद्धीची असल्याचा आर्थिक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी केला. या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार विभागाकडून दरवर्षी  तपासणी होत असते. मग त्यावेळी राज्य सरकार आणि सहकार विभाग झोपले होते काय?  सहकार विभागाचे जेव्हा ऑडिट होते त्यावेळी सहकार विभाग काय करते होते? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. पत्रकार,  शासकीय अधिकारी, सरकार आणि राजकीय पक्षाचा नेता या चौघांचे सिंडिकेट माझ्याविरोधात काम करत असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.

मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत दरेकर हे मजूर प्रवर्गातून बँकेवर संचालक म्हणून निवडून गेले होते. यावर तक्रार झाल्यानंतर सहकार विभागाने त्यांना अपात्र ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी राज्य सरकार केवळ सूडाने कारवाई करीत असले तरीही मी या विरोधात संघर्ष करणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

मी विरोधी पक्षनेता आहे आणि सरकारला ज्या पद्धतीने विविध विषयांवर मी जाब विचारतोय त्याचा पोटशूळ सरकारला आहे. त्याचबरोबर काही हितशत्रू प्रसारमाध्यमांचा आधार घेत वैयक्तिक लक्ष्य करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी, एक पत्रकार आणि सरकारी यंत्रणा असे सिंडिकेट करुन  दरेकरला दाबता येईल का? बदनाम करता येईल का, असा हा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. त्यांच्या कार्यक्रमाला मी भीक घालत नाही. कारण माझा विश्वास मुंबईकरांवर आहे. सहकारी कार्यकर्त्यांवर विश्वास आहे, असेही दरेकर म्हणाले.

मुंबई बँकेच्या निवडणुकीत १७ उमेदवार माझ्या नेतृत्वाखाली बिनविरोध विजयी झाले. तर चार जागांसाठीच्या झालेल्या निवडणुकीतही माझ्या नेतृत्वाखाली चारही जागा सहकार पॅनेलच्या आल्या. त्यामुळे काही राजकीय पुढारी माझ्या नावाने, बँकेच्या नावाने शिमगा करत आहेत. पण माझ्यावर लोकांचा विश्वास आहे, सभासदांचा विश्वास आहे, ग्राहकांचा विश्वास आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – corona virus : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितली त्रिसूत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -