घरताज्या घडामोडीकोरोनाबाधित रुग्णासोबत एका नातेवाईकाला राहण्याची मुभा ; अमित देशमुखांचा निर्णय

कोरोनाबाधित रुग्णासोबत एका नातेवाईकाला राहण्याची मुभा ; अमित देशमुखांचा निर्णय

Subscribe

राज्यात आत्तापर्यंत 180 हून अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यात मुंबईतील सर्वाधिक रुग्णालयातील निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमित देशमुख यांनी आज कोरोनी परिस्थितीचा आढावा घेतला.

राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मात्र यात पुन्हा एकदा हेल्थ वर्कर आणि डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने चिंतेत अधिक भर पडतेय. राज्यात आत्तापर्यंत 180 हून अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यात मुंबईतील सर्वाधिक रुग्णालयातील निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अमित देशमुख यांनी आज कोरोनी परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. नव्या औषधांबाबत एमसीआरकडे चर्चा करणार असून, कोरोना संदर्भातील नव्या मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहेत. याशिवाय रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णाबरोबर केवळ एकाच नातेवाईकाला राहण्याची मुभा देण्यात आली आहे,अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत सगळ्या वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्यांना सतर्क करण्यात आले आहे. कोरोना रुग्णवाढ ही झपाट्याने होत आहे.त्यामुळे पूर्वतयारीसह या सगळ्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये व्यवस्था कश्याप्रकारे आहे, याची शहानिशा करण्यात आली.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ज्या आवश्यकता भासतील याची या बैठकीत चर्चा करण्यात आली.तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनावर जे उपचार करायचे आहेत. त्यासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचनांबाबत आयसीएमआरने काही नियम जारी केले आहेत. याबाबत आढाव्यामध्ये चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

नव्या औषधाबाबत आयसीएमआरकडून स्पष्टता नाही

जसे उपचार दुसऱ्या लाटेमध्ये करत होतो तसेच उपचार हे या तिसऱ्या लाटेत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.काही नवी औषध या तिसऱ्या लाटेमध्ये उपयुक्त ठरतील अशी चर्चा होत आहे. मोलनूपिरावीर या औषधाची चर्चा होत असून, या  औषधासाठी आयसीएमआरने कोणतीही स्पष्टता दिली नाही.महाराष्ट्र शासनाकडे आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडे कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे याबाबत भारत सरकार आणि आयसीएमआरशी चर्चा करणार आहोत जेणेकरून, महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयात हे औषध उपलब्ध होईल.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्यामध्ये साधारणत: 827 हे बेडस पुरुषांसाठी आहेत, त्यापैकी जवळपास ९५ टक्के ऑक्सीजनेटेड बेड आहेत आणि पिडियाट्रीक बेड्स जवळपास 1500 आहेत.राज्यभरात 650 आयसीयू बेड आहेत.8 हजार 227 अडल्ट बेडपैकी जवळपास 2 हजार 125 आयसीयू बेड आहेत.त्याचबरोबर जिथे ऑक्सीजनेटेड जनरेशन प्लांट्स आहेत. त्यात ऑक्सीजनचा साठा 75 टक्के राखण्याचा उद्दिष्ट्ये ठेवलं आहे.

- Advertisement -

साधारणत: अडीचशे आरटीपीसीआर लॅबोरॅटरी आहेत.त्यापैकी शासकीय 80 आणि 175 खाजगी आहेत.जवळपास 1 लाख 30 हजार चाचण्या या प्रतिदिन करण्याची क्षमता राज्य सरकारची आहे. राज्याचा आज पॉझिटीव्हीटी रेट हा साधारणत: 11.46  आहे,याशिवाय या आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी ज्या कीट्स लागतात त्यासाठी १६ लाख कीट्स या पुढच्या सहा किंवा सात महिन्यात लागतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रुग्णालयांशी संदर्भात जे काही हेल्थ वर्कर आहेत.त्यांच्यासुद्धा चाचण्या नियमित कराव्या,असे अमित देशमुख यांनी सांगितले.


हे ही वाचा – Coronavirus : राज्यातील 180 हून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -