घरताज्या घडामोडीशरद पवारांची कोणाला ॲलर्जी असण्याचे कारण काय?, छगन भुजबळांचे पडळकरांना प्रत्युत्तर

शरद पवारांची कोणाला ॲलर्जी असण्याचे कारण काय?, छगन भुजबळांचे पडळकरांना प्रत्युत्तर

Subscribe

राज्य सरकारमधील मंत्री आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात चूकत असतील तर त्या त्रुटींवर बोट ठेवण्याचा हक्क शरद पवार यांना आहे. त्यांना काळजी वाटण्याचे सहाजिकच असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात यावे अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवारांनी सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक केली यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर हजर राहण्यासाठी आवाहन केल आहे. यावरुन अनेक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संपातून माघार घेतली आहे. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोडवण्याची महाविकास आघाडीची जबाबदारी आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शरद पवार यांची कोणाला अॅलर्जी असण्याचे काही कारण नाही. शरद पवार केवळ राज्यातीलच नाही तर देशातील अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाला राज्यात आणि देशात किंमत आहे. कामगारांची काळजी वाटणे सहाजिक असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

- Advertisement -

शरद पवारांनी गिरणी संप पाहिलाय

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आणि सर्वांनीच दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात झालेला गिरणी कामगारांचा संप पाहिला आहे. तो गिरणी संप संपल्याचे आतापर्यंत कोणी जाहीर केले नाही. ते संपकरी आता देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे एवढा अट्टहास करता कामा नये. राज्य सरकारमधील मंत्री आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात चूकत असतील तर त्या त्रुटींवर बोट ठेवण्याचा हक्क शरद पवार यांना आहे. त्यांना काळजी वाटण्याचे सहाजिकच असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

पडळकरांचा शरद पवारांवर निशाणा

सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. पडळकर म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. सरकारच्या महसूलात घट आणली आणि त्यामुळे शरद पवार यांना या विषयाबाबत खुलेआम चर्चा करण्यास भाग पाडली असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ST Worker Strike : पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वतः पुढे जाऊन संप मिटवा, पडळकरांचा अनिल परबांना टोला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -