घरताज्या घडामोडीOne Year Of Vaccination: कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती, केंद्राकडून विशेष स्टॅम्पचे अनावरण

One Year Of Vaccination: कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती, केंद्राकडून विशेष स्टॅम्पचे अनावरण

Subscribe

देशात लसीकरण मोहीमेच्या एका वर्षात जवळपास ९२ टक्के प्रौढ लोकसंख्येला किमान लसीचा एक डोस मिळाला आहे, तर ६८ टक्के लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

जीवघेण्या कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या वर्षी १६ जानेवारीला देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू झाली. या लसीकरण मोहिमेला काल, रविवारी १ वर्ष पूर्ण झाले. या संपूर्ण एका वर्षात १५६.७६ कोटी लसीचे डोस देण्यात आले. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, जवळपास ९२ टक्के प्रौढ लोकसंख्येला किमान लसीचा एक डोस मिळाला आहे, तर ६८ टक्के लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण झाले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने केंद्राकडून आता विशेष स्टॅम्प लाँच करण्यात आला आहे. या स्टॅम्पमध्ये एक आरोग्य कर्मचारी एका महिलेला लस देताना दाखवण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी हा स्टॅम्प जारी करत लिहिले आहे की, ‘हा स्टॅम्प देशभरातील फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी आणि वैज्ञानिक समुदायाने लोकांना कोरोना महामारीपासून वाचवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्य प्रतिबिंबित करते. एका वर्षात आम्ही १५६ कोटी डोस दिले आहेत. देशातील लसीकरण मोहीम ही जागतिक स्तरावरील एक आदर्श आहे.’

- Advertisement -

देशातील लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ३ जानेवारीला २०२०ला सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसीला आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय औषध मानक संस्थेच्या तज्ज्ञ समितीने मंजूरी दिली. त्यानंतर १६ जानेवारीपासून संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी २७७ दिवसात भारताने लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला होता. अमेरिका आणि चीन यांसारख्या बलाढ्य देशांच्या तुलनेत भारतात वेगाने लसीकरण मोहीम सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – UK मध्ये Self Isolation सक्ती हटणार, सरकार नियमात बदल करण्याच्या तयारीत


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -