घरट्रेंडिंगचेन स्मोकर बनला चिम्पांजी! स्वत:चं लायटर पेटवून दररोज पितो 40 सिगारेट

चेन स्मोकर बनला चिम्पांजी! स्वत:चं लायटर पेटवून दररोज पितो 40 सिगारेट

Subscribe

आजालिया 40 सिगरेट ओढून मोठ्या ऐटीत हवेत धूर सोडत असतो. सिगरेट पेटवण्यासाठी लायटर कसे पेटवायचे याचे शिक्षण त्याला देण्यात आले आहे. त्यामुळे तो एका माणसारखा लायटर पेटवून स्वत:ची सिगरेट स्वत: पेटवतो.

धू्म्रपान (Smoking) करणे शरिरासाठी हानिकारक आहे असे अनेक वेळा अनेक माध्यमातून आपल्याला सांगितले जाते. चेन स्मोकर्स दिवसाला सिगरेटची अनेक पाकिटे संपवतात. माणसांना सिगरेटचे वेड अनेक वर्षापासून आहे मात्र चिम्पांजी सिगरेट स्मोकर आहे असे तुम्हाला कोणी सांगितले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण कोरियाच्या प्राणी संग्रहालयात असलेला एक चिम्पांजी दररोज एक किंवा दोन नाहीतर तब्बल 40 सिगरेट ओढतो. (Chain smoking chimpanzee)  विशेष म्हणजे सिगरेट पिण्यासाठी लायटर देखील तो स्वत:च्या हातानेच पेटवतो. कोरियाच्या या प्राणीसंग्रहालयतील या चेन स्मोकर चिम्पांजीला पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करतात.

अजालिया असे या चेन स्मोकर चिम्पांजीचे नाव आहे. कोरियामध्ये त्याला डैले नावाने ओळखतात. हा चिम्पांजी सध्या 25 वर्षांचा असून कोरियाच्या प्योंयांग प्राणीसंग्रहालयात राहतो. प्राणीसंग्रहालयात येणाऱ्या सर्वांसाठी आजालिया हा मुख्य आकर्षण आहे. दररोज हा आजालिया 40 सिगरेट ओढून मोठ्या ऐटीत हवेत धूर सोडत असतो. सिगरेट पेटवण्यासाठी लायटर कसे पेटवायचे याचे शिक्षण त्याला देण्यात आले आहे. त्यामुळे तो एका माणसारखा लायटर पेटवून स्वत:ची सिगरेट स्वत: पेटवतो. चेन स्मोकर आजालिया हा उत्तम डान्स देखील करतो. आजालिया त्याच्या डान्समधून प्राणीसंग्रहालयात येणाऱ्या लोकांचे मनोरंजन करतो.

- Advertisement -

आजालिया ज्या प्राणीसंग्रहात राहतो तिथे त्याच्यासोबत हत्ती, जिराफ, पेंग्विन, गैलागो,मासे, मगर यासारखे अनेक प्राणी आहेत. मात्र यात हा चेन स्मोकर चिम्पांजी फार प्रसिद्ध आहे. 2016मध्ये किम जोंग उन यांनी या प्राणीसंग्रहालयाचे नुतनीकरण केल्यानंतर या चिम्पांजीचे नाव आजालिया असे ठेवले आणि त्यानंतर आजालिया तूफान प्रसिद्ध झाला.

पीपल फॉक द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्सचे अध्यक्ष इंग्रिड न्यूकिर्क यांनी म्हटले आहे की, लोकांचे मनोरंजन करण्यासाठी चिम्पांजीला सिगरेट देणे हे फार चूकीचे आहे. सिगरेटच्या धुरामुळे प्राणीसंग्रहालयातील इतर प्राणी पक्षांना त्रास होऊ शकतो. बऱ्याच तक्रारीनंतर आजालियाला सिगरेट देणे बंद करण्यात आले आहे आणि दिवसाला 40 सिगरेट पिणारा आजालिया आता सिगरेटमुक्त झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्राणी संग्रहालयात कोरोनाचा विळखा! तपासणी दरम्यानच सिंह – बिबट्याचा मृत्यू, तर ७० कर्मचाऱ्यांमध्ये लक्षणं

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -