घरताज्या घडामोडीNagar Panchayat Election : भाजपच्या ४०० पेक्षा जास्त जागा, सत्तेबाहेर असून पक्षाचे...

Nagar Panchayat Election : भाजपच्या ४०० पेक्षा जास्त जागा, सत्तेबाहेर असून पक्षाचे संघटन मजबूत – चंद्रकांत पाटील

Subscribe

ग्रामपंचायतींच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका किंवा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने भाजपाला कौल दिला होता. तसाच कौल नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुकीतही दिला असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्यातील जिल्हा परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये ३ पक्ष एकत्र असूनही भाजपने चांगली कामगिरी केली आहे. भाजपच्या राज्यातील नगरपंचायतींमध्ये एकूण ४०० पेक्षा अधिक जागा आल्या आहेत. भाजप राज्यात सत्तेत नाही. महाविकास आघाडी सत्तेत असूनही जनतेनं भाजपला पसंती दिली आहे. सत्ताधारी पक्षांतील बेबनाव आहे आणि त्यांच्या समन्वय नाही. याला सर्व प्रकाराला राज्यातील जनता कंटाळली असून नाराज आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या असून पुन्हा एकदा ‘भाजप नंबर वन’ हे सिद्ध झाले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला, भाजपला या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन ३४ नगरपालिका – नगरपंचायतींमध्ये भाजपची सत्ता असेल. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असेल तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजपा सत्तेवर येईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. गेले २६ महिने भाजप राज्यात सत्तेबाहेर आहे तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे. भाजपच्या नेते – कार्यकर्त्यांची एकजूट आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

आघाडीमध्ये बेबनाव, जनता नाराज

सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नाही. कोरोनाचा सामना करणे आणि राज्यात विकासकामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाईमध्ये गुंतले आहेत. जनता या प्रकाराला कंटाळली आहे. जनतेची नाराजी नगरपालिका – नगर पंचायतींच्या निकालात दिसली असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राज्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका किंवा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने भाजपला कौल दिला होता. तसाच कौल नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुकीतही दिला असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.


हेही वाचा : धनशक्ती सत्तेचा गैरवापर केला तरी भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार, फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -