घरमहाराष्ट्रमराठा मोर्चा; दिलेला शब्द पाळा, नाहीतर सत्तेची मस्ती उतरवू

मराठा मोर्चा; दिलेला शब्द पाळा, नाहीतर सत्तेची मस्ती उतरवू

Subscribe

१५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा ठोस निर्णय न झाल्यास २० नोव्हेंबर पासून एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे.

मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षणाचे आश्वासन १५ नोव्हेंबरपर्यंत पुर्ण करावे, अशी मागणीच आज पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा अन्यथा सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच मराठा मोर्चाचे समन्वयक नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई येथे आज मराठा मोर्चाच्या समनव्यकांची बैठक झाली, यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारने १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा ठोस निर्णय नाही घेतला तर २० नोव्हेंबरपासून तुळजापूर आणि मुंबईत आझाद मैदान येथे लाखो मराठ बांधव उपोषणाला बसणार आहोत, अशी भूमिका नानासाहेब जावळे यांनी व्यक्त केली. त्यापुढेही जर मराठा बांधवांच्या मागण्यांकडे लक्ष दिले गेले नाही तर समाजाचा उद्रेक बाहेर पडेल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

आरक्षणाच्या मागणीबरोबर शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवले पाहीजेत, अशी भूमिका समन्वयकांनी व्यक्त केली. राज्यात आता दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर उपाययोजना त्यांच्यापर्यंत पोहोचवा, नाहीतर दिवाळीनंतर आम्ही एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा जावळे पाटील यांनी दिला आहे.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक मराठा तरुणांवर भादंवि कलम ३९५ सारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही हे गुन्हे मागे घेतलेले नाहीत. सरकारने दिलेला शब्द पाळावा अन्यथा सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच समन्वयकांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -