घरताज्या घडामोडीKiran Mane: किरण मानेंबाबत तिढा चॅनेलने सोडवावा; जितेंद्र आव्हाडांची आक्रमक भूमिका

Kiran Mane: किरण मानेंबाबत तिढा चॅनेलने सोडवावा; जितेंद्र आव्हाडांची आक्रमक भूमिका

Subscribe

प्रोडक्शन हाऊसने सामंजस्याने हा प्रश्न सोडवावा आणि कोणावरही अन्याय होऊ नये अशी योग्य भूमिका घ्यावी. स्टार प्रवाहचे क्रिटेव्हिड हेड सतीश राजवाडे हे प्रोडक्शन टीमला घेऊन येणार असून या विषयावर पुन्हा एक बैठक होणार आहे.

अभिनेते किरण माने (Kiran Mane)  आणि सतीश राजवाडे (Satish Rajwade)  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची भेट घेतली. किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Jhali Ho )  मालिकेतून काढून टाकल्यानंतर निर्माण झालेल्या वादासंदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe)  यांच्या नेतृत्वात किरण माने आणि सतीश राजवाडे यांनी जितेंद्र आव्हाडांची भेट घेतली. या बैठकीत आव्हाडांनी किरण माने आणि सतीश राजवाडे यांच्याशी चर्चा केली. किरण मानेंबाबत निर्माण झालेला तिढा हा चॅनेलने सोडवावा, अशी आक्रमक भूमिका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतली.

प्रोडक्शन हाऊसने सामंजस्याने हा प्रश्न सोडवावा आणि कोणावरही अन्याय होऊ नये अशी योग्य भूमिका घ्यावी. स्टार प्रवाहचे क्रिटेव्हिड हेड सतीश राजवाडे हे प्रोडक्शन टीमला घेऊन येणार असून या विषयावर पुन्हा एक बैठक होणार आहे. अशा प्रकारच्या प्रकरणात एका बैठकीत काम होत नाही. त्यामुळे पुन्हा एक बैठक घेऊन यावर चर्चा होणार असल्याचे आव्हाडांनी सांगितले.

- Advertisement -

चॅनेलला दिली समज

यावेळी जितेंद्र आव्हाडांनी किरण माने यांना तडखाफडकी मालिकेतून काढून टाकल्याने तीव्र संपात व्यक्त करत चॅनलला खडे बोल सुनावले ते म्हणाले, अचानक एका कलाकाराला कामावरुन काढून टाकण्यात येते. एखाद्याला कामावरुन काढून टाकताना त्याला कोणत्या कारणांसाठी कामावरुन काढून टाकत आहोत याची कल्पना द्यावी, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

मी विचार करुन भूमिका घेतो 

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली एक चांगली मालिका बंद होऊ नये आणि किरण मानेंसारख्या चांगल्या कलाकाराला काम मिळावे ही माझी इच्छा आहे आणि म्हणून मी या प्रकरणात लक्ष घातले. तसा माझ्या या सिनेसृष्टीची काहीही संबंध नाही परंतु किरण मानेंची पोस्ट पाहिल्यानंतर त्याचे विचार ऐकल्यानंतर  त्याची बाजू घ्यावी असे मला वाटले. सामाजिक भूमिका घेणाऱ्या कलाकाराच्या पोटावर पाय देणे चुकीचे असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. मी एकदा भूमिका घेतली की त्यातून मी पाय मागे घेत नाही. मी विचार करुन आणि पटल तर भूमिका घेतो, असे आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

माने संघर्ष करुन इथवर पोहचले 

किरण माने सारखे कलाकार त्यांच्या आयुष्यात फार संघर्ष करुन इथवर येऊन पोहचले आहेत. मुंबईत जे कलाकार येतात त्यांची पार्श्वभूमीवर पहावी. त्यांनी फार संघर्ष करुन पुढे आले आहेत. त्यांना अशा प्रकारे काढून टाकल्यानंतर त्यांच्या बाजूने कोणीतरी उभे राहायला हवे. हा राजकीय प्रश्न नाहीये. हा प्रश्न बापाची नोकरी गेल्यावर काय हाल होतात हे मी फार जवळून पाहिले आहे. त्यामुळे मी गरीबाची आणि शेतकऱ्याच्या मुलाची बाजू घेतोय, असे आव्हाड म्हणाले.


हेही वाचा –  Kiran Mane: किरण माने वादात संभाजी ब्रिगेडची उडी! ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या सेटवर ठिय्या आंदोलन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -