घरताज्या घडामोडी'ही लो बजेट समांथा', उर्फीच्या Oo Antava डान्सवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा वर्षाव

‘ही लो बजेट समांथा’, उर्फीच्या Oo Antava डान्सवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा वर्षाव

Subscribe

उर्फीचा डान्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला नसला तरी उर्फीचा नेहमीप्रमाणे हॉट अँड बोल्ड अवतार पसंतीस उतरला आहे. उर्फीने या व्हिडीओत डार्क पिंक कलरची प्लेन साडी आणि डीप नेक डिझाइनर ब्लॉउज घातला आहे.

अल्लू अर्जुन (Allu Arjun )  समांथा रुथ प्रभूचं (Samantha ruth prabhu )  ऊ अंटावा (Oo Antava)  हे गाणे सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. ऊ अंटावावर दोघांचा कमाल डान्स पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर देखील हे गाणे ट्रेडिंगमध्ये असून रिल्सवर देखील गाणं व्हायरल होत आहे.अनेक जण यावर कमाल धम्माल रिल्स बनवत असतात. बोल्ड अँड हॉट उर्फी जावेदने (Urfi javed)  देखील ऊ अंटावावर रिल्स शेअर करत डान्स केलाय. मात्र नेहमी प्रमाणे उर्फीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

उर्फीने पुष्पाच्या ऊ अंटावा गाण्यावर थिकरत डान्स केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडला. उर्फीने शेअर केलेला व्हिडीओ हा एका स्टूडिओमधील असून ती फोटोशूटमध्ये व्यस्त दिसत आहे. फोटोशूटच्या ब्रेकमध्ये उर्फीने हा रिल्स शूट केलाय. या गाण्यावर एक रिल्स बनवावीच लागली. एक डान्सर म्हणून नाही तर टाइमपास म्हणून व्हिडीओ शेअर केला असल्याचे उर्फीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

- Advertisement -

उर्फीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. ‘ही तर लो बजेट समांथा’, तर दुसऱ्याने म्हटलेय, ‘एक्प्रेशन खूप वाईट’. उर्फीचा डान्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला नसला तरी उर्फीचा नेहमीप्रमाणे हॉट अँड बोल्ड अवतार पसंतीस उतरला आहे. उर्फीने या व्हिडीओत डार्क पिंक कलरची प्लेन साडी आणि डीप नेक डिझाइनर ब्लॉउज घातला आहे. केस थोडे विस्कटलेले असताना उर्फी साडी सांभाळत ऊ अंटावावर डान्स करतना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

- Advertisement -

उर्फीने काही दिवसांपूर्वी ऐन थंडीत  मास्क किंवा स्वेटर नाही तर थेट Black Lingerie वर फोटोशूट केले होते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. उर्फीला थंडी वाजत नाही का अशा अनेक कमेंट या फोटोंवर पहायला मिळाल्या होत्या.


हेही वाचा – ऐन थंडीत Urfi Javedच्या हॉटनेसने नेटकरी घायाळ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -