घरताज्या घडामोडीमोदींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अन्यथा..., नाना पटोलेंचा इशारा

मोदींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अन्यथा…, नाना पटोलेंचा इशारा

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर घणाघात केला आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. महाराष्ट्राने देशाला अनेक वर्षे दिशा दाखवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत महाराष्ट्रातून स्थलांतर करणाऱ्या मजुरांमुळे कोरोनाचा संसर्ग पसरला असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील धन्यावद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसने कोरोना पसरवण्याचे काम केले असल्याची टीका केली आहे. कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्यांना काँग्रेसनं तिकीट काढून त्यांच्या राज्यात पाठवल्यामुळे देशात कोरोना वाढला आहे. याविरोधात महाराष्ट्र काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी सरकारला दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर घणाघात केला आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. महाराष्ट्राने देशाला अनेक वर्षे दिशा दाखवली आहे.

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण लोकसभेत आणि राज्यसभेत झाले. खर तर पंतप्रधान हे देशाचे असतात परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान ज्या पद्धतीने कऱण्यात आला. राजकीय व्यवस्थेमध्ये देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेले व्यक्ती स्वतःला अजूनही भाजपचे प्रचारक म्हणून वागत असतील तर त्या पदाची गरीमा संपवणं हे भाजपला वाटत असेल तर ठीक आहे, असे नाना पटोले म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान

पण हा महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजपने जाहीर माफी मागितली पाहिजे. पंतप्रधानांनीसुद्धा माफी मागितली पाहिजे, ज्या महाराष्ट्राने देशाला खूप काही दिले आहे. ज्या महाराष्ट्राने प्रत्येक राज्याला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. गुजरातमध्ये भूकंप आला तर त्यासाठी सर्वात जास्त मदत या महाराष्ट्राने केली आहे. ज्या मुंबईने धीरुबाई अंबानी, गौतम अदानी असतील यांना श्रीमंत करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. अभिनेते होण्यासाठी आलेल्या लोकांना मोठं करण्याचे काम ज्या महाराष्ट्राने केले त्या महाराष्ट्राला अपमानित करण्याचे काम झालं आहे. त्याला खऱ्या अर्थाने निषेध करु तेवढा कमी होईल असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या भाजपच्या लोकांनी स्पष्ट केले पाहिजे. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. उद्यापासून महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी करणार आहोत. निषेधाची फलक घेऊन उभे राहणार आहोत. महाराष्ट्राच्या अपमानाचा निषेध करण्याची भूमिका घेणार असून हे आम्ही सहन करणार नाही असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : पवार अनेक क्षेत्रातील लोकांसाठी प्रेरणादायी, त्यांचा आदर्श घ्या, PM मोदींकडून शरद पवारांचे कौतुक

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -