घरताज्या घडामोडीRussia-ukraine-रशिया 16 फेब्रुवारीलाच युक्रेनवर हल्ला का करू शकते? यामागे काय आहे कारण?

Russia-ukraine-रशिया 16 फेब्रुवारीलाच युक्रेनवर हल्ला का करू शकते? यामागे काय आहे कारण?

Subscribe

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदीमीर जेलेंस्की यांनी 16 फेब्रुवारीला रशिया युक्रेनवर हल्ला करण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचा दावा केला आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव वाढला असून कुठल्याही क्षणी हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष रशिया आणि युक्रेनच्या हालचालींकडे आहे. याचदरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदीमीर जेलेंस्की यांनी 16 फेब्रुवारीला रशिया युक्रेनवर हल्ला करण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचा दावा केला आहे. यामुळे 16 फेब्रुवारीलाच रशिया युक्रेनवर हल्ला का करेल यावर आता तर्क वितर्क लढवले जात आहेत. तर तज्त्रांच्या मते अमेरिकेने केलेल्या दाव्याप्रमाणे या तारखेमागे बीजींगमध्ये सुरू असलेले विंटर ऑल्मिपिक हे देखील एक कारण आहे. कारण ऑलिम्पिकमधील मुख्य कार्य़क्रम जरी 16 फेब्रुवारीपर्यंत संपणार असले तरी ऑलिम्पिक 20 फेब्रुवारीपर्यंत आहे. याचपार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनवर रशिया बीजिंग ऑल्मिपिक कालावधीतच हल्ला करेल असा दावा केला आहे. त्यामुळे जगभरात रशियाचा दबदबा वाढेल हे देखील त्यामागचे एक कारण आहे.

याचदरम्यान, युक्रेनने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना काही दिवस कीवमध्ये राहण्याचे आमंत्रण दिले आहे. कारण बायडेन युक्रेनमध्ये आल्यास रशिया युक्रेनवर हल्ला करण्याचे धाडस करु शकणार नाही. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये तणाव वाढला आहे. अमेरिकेकडून युक्रेनला वारंवार सावध राहण्याचे तयार राहण्याचा इशारा दिला जात आहे. रशियाचे एक लाख सैनिक युक्रेनच्या सीमेवर पोहचले आहेत. मोठ्या प्रमाणात शस्त्र,युद्धसामग्री युक्रेनच्या सीमेवर आणण्यात आली आहे. यामुळे युक्रेनने राजधानी कीवमधील अनेक देशांचे दूतावास बंद करत ते लवावी येथे अनियमित काळासाठी हलवले आहेत. तर अनेक देशांनी आपल्या नागरिकांना तातडीने युक्रेन सोडण्याचे अपील केले आहेत. तसेच अनेक देशांनी युक्रेन आणि रशियाला जाणारी विमानसेवा बंद केली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -