घरमहाराष्ट्रनारायण राणेंनी खुर्चीसाठी लाचारी अन् बेईमानी केली, विनायक राऊतांचा पलटवार

नारायण राणेंनी खुर्चीसाठी लाचारी अन् बेईमानी केली, विनायक राऊतांचा पलटवार

Subscribe

महाराष्ट्राच्या विकासाकडे ते झेपावत आहे. त्यामुळे उठलेला पोटशूळ आणि पोटदुखी नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतून दिसून आली. नारायण राणेंची कात्रणं आणि व्हिडीओ आम्ही दाखवत आहोत. डोक्यावर केस जरी नकली आले, तरी बुद्धी काय येते असे नाही, असा टोलाही विनायक राऊतांनी लगावलाय

मुंबईः भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं होतं, त्यालाच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणेंनी खुर्चीसाठी लाचारी केलेली आहे. खुर्चीसाठी बेईमानी केलेली आहे. बाळासाहेबांच्या कृपेने केवळ आणि केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. परंतु काँग्रेसमध्ये जाऊन किंवा भाजपमध्ये जाऊन लाचारी करून त्यांनी मंत्रिपद मिळवलेलं आहे, असंही विनायक राऊत म्हणालेत. विनायक राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते.

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेची पोलखोल आम्ही केलेली आहे. हा फक्त पहिला टप्पा दिलेला आहे, अजून नारायण राणेंचे असे बरेच टप्पे आहेत. पुढच्या वर्षभर आम्ही ते देऊ शकतो. कालची पत्रकार परिषद शिवसेना नेते म्हणून संजय राऊतांनी घेतली. शिवसेना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. महाविकास आघाडीचं सरकारही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्राच्या विकासाकडे ते झेपावत आहे. त्यामुळे उठलेला पोटशूळ आणि पोटदुखी नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतून दिसून आली. नारायण राणेंची कात्रणं आणि व्हिडीओ आम्ही दाखवत आहोत. डोक्यावर केस जरी नकली आले, तरी बुद्धी काय येते असे नाही, असा टोलाही विनायक राऊतांनी लगावलाय. नारायण राणेंविषयी बोलताना एक म्हण आठवते म्हणत त्यांनी बाटगा जास्त कोडगा असतो असे म्हणत त्यांनी नारायण राणेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

त्यामुळेच संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आणि तेवढ्याच ताकदीचे पत्रकार आहेत. महाविकास आघाडीचे ते पाठीराखे आहेत. त्यांच्या मुख्यमंत्री नव्हे, तर कोणत्याही मंत्रिपदावर डोळा नाही. नारायण राणेंना हे कळणार नाही, कारण त्यांनी खुर्चीसाठी लाचारी केलेली आहे. खुर्चीसाठी बेईमानी केलेली आहे. बाळासाहेबांच्या कृपेने केवळ आणि केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. परंतु काँग्रेसमध्ये जाऊन किंवा भाजपमध्ये जाऊन लाचारी करून त्यांनी मंत्रिपद मिळवलेलं आहे. तसं संजय राऊत साहेबांचं नाही. महाराष्ट्रात बेईमानीला धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला स्वीकारलेला आहे. तिथे लाचारी नाही. ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली, ज्यांनी मातोश्रीशी बेईमानी केली, ज्यांनी मराठी माणसांशी बेईमानी केली. त्यांची प्रकरणं बाहेर काढलेली आहेत. बाळासाहेबांनी त्यांना शिवसेनेते घेतले, शिवसेनेचे नेते केले, खासदार केले. पण बाळासाहेब द्रष्टे नेते होते. संजय राऊतांची नेमकी क्षमता किती हे त्यांना माहिती होतं आणि नारायण राणेंची लायकी किती आहे. केंद्राच्या यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय. महाविकास आघाडीमध्ये जाणीवपूर्वक कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास दिला जात नाही. ज्या पद्धतीने संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला झाला. त्या खुनी आरोपीचे सगळे लागेबांधे नितेश राणेंवर होते. म्हणून नितेश राणेंवर कारवाई झालेली आहे, असंही विनायक राऊतांनी सांगितलंय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -