घरताज्या घडामोडीमराठी भाषेला 'अभिजात' भाषेचा दर्जा द्या, चार हजार पोस्ट कार्डस राष्ट्रपतींकडे रवाना

मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा द्या, चार हजार पोस्ट कार्डस राष्ट्रपतींकडे रवाना

Subscribe

मराठी भाषेला “अभिजात” भाषेचा दर्जा मिळावा मागणीची चार हजार पोस्ट कार्डस रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनाकडे रवाना करण्यात आली.

मराठी भाषेला “अभिजात” दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे. हा “अभिजात” दर्जा २७ फेब्रुवारी २०२२रोजी मराठी भाषा दिवस आहे त्याआधी मिळावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.

- Advertisement -

त्याचाच एक भाग म्हणून आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुमारे ४ हजार पोस्ट कार्ड्स राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आली. हा पोस्ट कार्ड्स पाठविण्याचा दुसरा संच आहे, याआधी सुद्धा एक संच राष्ट्रपतींना पाठविण्यात आला आहे. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.


हेही वाचा : Pakistan Super League: राशिद खानने सोडली टीमची साथ, खेळाडूंनी दिला गार्ड ऑफ ऑनर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -