घरमुंबईवरळी आग दुर्घटनेतून वाचलेल्या मुलाला शिवसेनेने घेतले दत्तक; 15 लाखांची मदत अन्...

वरळी आग दुर्घटनेतून वाचलेल्या मुलाला शिवसेनेने घेतले दत्तक; 15 लाखांची मदत अन् दरमहा 5-10 हजार खात्यात येणार

Subscribe

महापालिका व शिवसेना परिवाराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी राखत १५ लाखांच्या आर्थिक मदतीचा हात दिला आहे. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत पवार सर व कस्तुरबा रुग्णालय वैद्यकीय समूह उपस्थित होते. असं ट्विट महापौरांनी केलं आहे.

गेल्या वर्षी मुंबईतील वरळी येथील एका चाळीत लागलेल्या आगीतून वाचलेल्या 6 वर्षांच्या चिमुरड्याला शिवसेनेने दत्तक घेतले आहे. यामुळे चिमुरड्याचा शिक्षणाचा पूर्ण खर्च आता शिवसेना उचलणार आहे. 30 नोव्हेंबर 2021 रोजी वरळीत  लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तर या घटनेतून वाचलेल्या परंतु गंभीर जखमी झालेल्या मुलाला तब्बल दोन महिन्यांनंतर मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

मंगळवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, मुंबईच्या वरळी परिसरातील एका चाळीत गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले. यातील तीन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र यातून वाचलेल्या पाच वर्षाच्या बालकाची प्रकृतीही गंभीर होती. त्याच्यावर दोन महिन्यांपासून कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्या मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

त्यावर पुढे महापौर म्हणाल्या की, हा चिमुकला सध्या पुण्यात आपल्या आजोबांकडे राहत आहे. आम्ही त्याला 15 लाखांची आर्थित मदत दिली आहे. तर दर महिन्याला त्याच्या खात्यात 5,000 – 10,000 रुपये पाठवले जातील. त्याच्या शिक्षणाचा खर्च आम्ही उचलू. आता त्याची जबाबदारी शिवसेनेची आहे.


महापौर किशोरी किशोर पेडणेकर, आमदार यामिनी यशवंत जाधव व उपमहापौर सुहास वाडकर यांच्या उपस्थितीत वरळी येथील सिलिंडर स्फोटात जखमी झालेला बालक कु. विष्णू पुरी (वय 5 वर्षे ) आज सुखरूपपणे बरा होऊन घरी जात आहे. त्याप्रसंगी महापालिका व शिवसेना परिवाराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी राखत १५ लाखांच्या आर्थिक मदतीचा हात दिला आहे. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत पवार सर व कस्तुरबा रुग्णालय वैद्यकीय समूह उपस्थित होते. असं ट्विट महापौरांनी केलं आहे.

- Advertisement -


कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात सांगितले, “हिजाब घालण्याचा अधिकार घटनेच्या कलम 25 अंतर्गत येत नाही”


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -