घरमनोरंजनअजय देवगणला अवॉर्ड फंक्शनला जाणे का आवडत नाही? काजोलने 23 वर्षांनंतर केला...

अजय देवगणला अवॉर्ड फंक्शनला जाणे का आवडत नाही? काजोलने 23 वर्षांनंतर केला खुलासा

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांनी 24 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न करत त्यांनी त्यांच्या नात्याला एक नवीन नाव दिले. काजोल आणि अजय देवगणने नुकत्याच त्यांच्या 23 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एकमेकांना खूप सुंदर पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काजोलचे अभिनंदन करणारा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अजय देवगण म्हणतोय की, काजोल अजूनही माझ्यासोबत आहे याचे मला खरोखरच आश्चर्य वाटत आहे. हे ऐकून काजोल ‘awww’ म्हणते, यावेळी काजोलने दिलेल्या अप्रतिम एक्सप्रेशन्स अगदी पाहण्यासारख्य होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

- Advertisement -

दुसरीकडे, काजोलनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा आणि अजय देवगणचा जुना फोटो शेअर केला आहे, जो 90 च्या दशकातील आहे. पोस्ट केलेल्या फोटोसोबत काजोलने तब्बल 23 वर्षांनंतर अजय देवगणला अवॉर्ड फंक्शनला जाणे का आवडत नाही, याचा खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

- Advertisement -

काजोलने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘धावणे, चालणे, लंगडणे, लाथ मारणे, ओरडणे, यानंतर आम्ही 23 वर्षांनंतर इथपर्यंत पोहचलो. यासाठी आम्हाला पुरस्कार मिळाला पाहिले की आमच्याकडे प्रेमळ नजरेने बघायला पाहिजे? काहीही असो, तु पुरस्कार सोहळ्याबद्दल काय विचार करतोस ते मला माहीत आहे. मी आता तुझ्यासमोर डोकं टेकते.

काजोलच्या या फोटोवर कमेंट करताना अजय देवगणनेही लिहिले की, ‘मला माझा पुरस्कार 23 वर्षांपूर्वी मिळाला आहे’. काजोल आणि अजय देवगण स्वभावाने पूर्णपणे विरुद्ध आहेत. काजोल बबली आहे तर अजय देवगण शांत स्वभावाचा आहे. काजोल आणि अजय देवगण यांना 2 मुले आहेत, त्यांच्या मुलीचे नाव न्यासा आहे, जी तिच्या आईप्रमाणेच दिसायला  सुंदर आहे.


Ghudchadi : रवीना टंडन अन् संजय दत्तची सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -