घरताज्या घडामोडीBachchan Pandeyचं नवं गाणं रिलीज, अक्षय कुमारचा भावूक अंदाज

Bachchan Pandeyचं नवं गाणं रिलीज, अक्षय कुमारचा भावूक अंदाज

Subscribe

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारला भावनांमध्ये कोणताही रस नसल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र आता या गाण्यात अक्षय कुमारची भावूक बाजू दाखवण्यात आली आहे.

Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या बच्चन पांडे सिनेमाची मागच्या काही दिवसापांसून चर्चा आहे. बच्चन पांडेमध्ये अक्षय कुमारचा आगळा वेळा लूक पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी प्रचंड उत्साही आहेत. ट्रेलरमधून अक्षयचा डॅशिंग अंदाज समोर आला. ट्रेलर नंतर सिनेमा पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली असताना सिनेमाचे नवे गाणे रिलीज झाले आहे. ‘मेरी जान – मेरी जान’ या गाण्यात अक्षय कुमार अभिनेत्री कृती सेनन सोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. संपूर्ण गाण्यात अक्षय कुठेतरी भावूक झाल्याचेही दिसून आले आहे.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारला भावनांमध्ये कोणताही रस नसल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र आता या गाण्यात अक्षय कुमारची भावूक बाजू दाखवण्यात आली आहे. गाण्याची सुरुवातच भावूक डायलॉगने होते.  ‘भले ही बच्चन भैया का दिल और आंख पत्थर का है, लेकिन आज भी अपने लोगो के लिए उनके दिल मे फिलिंग है, इमोशन्स है’ या डायलॉगनंतर अक्षय कुमार रडत रडत कृतीला मिठी मारतो आणि दोघांमध्ये रोमान्सला सुरुवात होते.

- Advertisement -

३ मिनिट ६ सेकंदाच्या गाण्यात सिंगर बी प्राकच्या आवाजाने लोकांना खिळवून ठेवले आहे. तर जानी याने गाण्याला म्युझिक दिले आहे. दोन्हीचा योग्य ताळमेळ साधल्याने या गाण्याने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याचप्रमाणे गाण्यात सुंदर व्हिज्युअल्स घेण्यात आले आहे.

अक्षय आणि कृतीसह सिनेमात अभिनेत्री जँकलिन फर्नाडिसही मुख्य भूमिकेत आहेत. तर अक्षय कुमार सिनेमात बच्चन पांडेच्या भूमिकेत आहे. जॅकलिन ही बच्चन पांडेची गर्लफ्रेंड सोफीयाची भूमिका साकारणार आहे. सिनेमा १८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Adipurush Release Date : प्रभासचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ येणार 2023 मध्ये भेटीला

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -