घरताज्या घडामोडी'गंगूबाई काठियावाडी' ते 'नीरजा'पर्यंत; महिलांवरील आधारित 'या' चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक गल्ला...

‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘नीरजा’पर्यंत; महिलांवरील आधारित ‘या’ चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक गल्ला कमावला

Subscribe

सध्या बॉक्स ऑफिसवर ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचा धुमाकूळ सुरू आहे. यापूर्वी बॉलिवूडमध्ये महिलांवर आधारित अनेक चित्रपट आले आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली आहे. महिलांवरील आधारित बॉलिवूडमधील या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले होते. आज आपण बॉलिवूडच्या अशा काही महिलांवरील आधारित चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

गंगूबाई काठियावाडी

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचा सध्या बोलबोला आहे. या चित्रपटाने एका आठवड्यात १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

- Advertisement -

तनु वेड्स मनु रिटर्न्स

जेव्हा कंगनाचा रनौतच्या ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा या चित्रपटाने प्रेक्षकांचा भरपूर हसवले होते. कंगनाच्या या चित्रपटाचे प्रेक्षकांसह समिक्षकांनी देखील यांचे भरभरून कौतूक केले होते. ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ चित्रपटातील कंगना आणि आर माधवनची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटाने जगभरात एकूण 255.3 कोटी रुपयांची कमाई केली.

स्त्री

‘स्त्री’ या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरने दमदार अभिनय केला आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाने १३० कोटी रुपयांची कमाई केली होतीय

राझी

आलिया भट्टचा देशप्रेमावर आधारित ‘राझी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने जवळपास 195 कोटींची कमाई केली आहे.

नीरजा

सोनम कपूरने ‘नीरजा’ चित्रपटात केबिन क्रू मेंबर नीरजा भानोतची भूमिका साकारली होती. हा चित्रपट नीरजा भानोत यांच्या जीवनावर आधारित आहे. सोनम कपूरने या चित्रपटात उत्तम काम केले आहे. तिच्या अभिनयाबद्दल तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. ‘नीरजा’ हा चित्रपट उत्तम प्रकारे बनवलेला चित्रपट होता, ज्याने प्रेक्षकांवर अमीट छाप सोडली होती. या चित्रपटाने जगभरात १३१ कोटींची कमाई केली आहे.


हेही वाचा – रात्री माझा व्हिडिओ बघतात, अन् सकाळी ट्रोल करतात, पूनम पांडेला सोडायचाय भारत


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -