घरटेक-वेकToyota Mirai : नितीन गडकरींनी लाँच केली देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्यूल...

Toyota Mirai : नितीन गडकरींनी लाँच केली देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्यूल सेल इलेक्ट्रिक कार , काय आहेत वैशिष्ट्ये ?

Subscribe

देशात हरित हायड्रोजन आधारित परिसंस्था निर्माण करणे हा या प्रकल्पाचा पहिला उद्देश आहे. ही कार टोयोटा आणि किर्लोस्कर यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे.

देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्यूल सेल इलेस्ट्रिक कार लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोयोटा मिराई या इलेक्ट्रिक गाडीचे लोकार्पण केले. देशात हरित हायड्रोजन आधारित परिसंस्था निर्माण करणे हा या प्रकल्पाचा पहिला उद्देश आहे. ही कार टोयोटा आणि किर्लोस्कर यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे.

- Advertisement -

जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असलेल्या ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (एफसीईव्ही) टोयोटा मिराई कारच्या लोकार्पणावेळी नितीन गडकरींसह केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, आर के सिंह, महेंद्र नाथ पांडे, टोयोटा किर्लोस्कर मोटर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझू योशिमुरा, टिकेएम लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेइकल (एफसीईव्ही), हायड्रोजनवर चालणाऱ्या सर्वोत्तम शून्य उत्सर्जन उपायांपैकी एक आहे. हे पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. गाडीच्या टेलपाईपमधून( इंधनाचे ज्वलन झाल्यावर उत्सर्जन बाहेर सोडणारा पाईप) पाण्याशिवाय इतर कोणतेही उत्सर्जन यात होत नाही.

- Advertisement -

काय आहेत Toyota Miraiची वैशिष्ट्ये ?

  • ही कार एका चार्जमध्ये ६०० किमी पर्यंत चालू शकते.
  • टोयोटाने मिराई कारमध्ये हायड्रोजन इंधन सेल बॅटरी पॅक दिला आहे.
  • कार पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे.
  • कारच्या मागच्या बाजूला १.४ kWh बॅटरी देण्यात आली आहे.
  • इतर इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा ही कार ३० पट कमी आहे. परंतु एका सिलेंडरवर ६५० किमी प्रवास करू शकते.
  • एका सिलेंडरमध्ये सुमारे ५.६ किलो हायड्रोजन भरला जातो.
  • अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून हरित हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो.
  • हरित हायड्रोजनच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि अवलंब करण्यात आलाय.
  • भारतासाठी भविष्यात स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा सुनिश्चित करण्यात ही कार महत्त्वाची भूमिका बजावेल.

हेही वाचा – होळीपूर्वी ‘रिलायन्स जिओ’चा सर्वात स्वस्त ‘जिओ फोन नेक्स्ट’ 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -