घरक्रीडाKing joins RCB camp: किंग कोहली इज बॅक, आरसीबीकडून विराटचे जंगी स्वागत

King joins RCB camp: किंग कोहली इज बॅक, आरसीबीकडून विराटचे जंगी स्वागत

Subscribe

आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामाला २६ मार्चपासून सुरूवात होणार आहे. यंदाच्या हंगामात दहा संघ खेळताना आपल्याला पहायला मिळणार आहे. रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीचं संघात आगमन झालं आहे. कोहलीचं संघात आगमन झाल्याची माहिती रॉयल चॅलेंजर बंगळुरूने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. आरसीबीने विराटचे चार वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. किंग कोहलीचं संघात आगमन झालंय. हीच तर बातमी आहे, अशा प्रकारचं ट्विट आरसीबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर केलं आहे. तसेच विराटचं संघामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

- Advertisement -

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजेतापद असलेला संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. विराट कोहलीने तब्बल ९ वर्षे आरसीबीचे कर्णधारपद भूषवले. आयपीएलच्या १४ व्या हंगामानंतर विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडले. कोहली आता दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेल्या फाफ डू प्लेसिसला आरसीबीने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात ७ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

आयपीएलमध्ये कोहलीने झळकावली ५ शतकं

कर्णधारपद सोडल्यानंतर कोहली कोणत्याही दबावाशिवाय खेळू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावत कोहलीला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अशा स्थितीत आयपीएलमध्ये पुन्हा एकदा चांगला फॉर्म मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.

- Advertisement -

नोव्हेंबर २०१९ मध्ये कोहलीने शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत पाच शतकं झळकावली आहेत. २०७ आयपीएल सामन्यांमध्ये विराटच्या नावावर ६ हजार २८३ धावा आहेत. ज्यामध्ये ११३ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

आयपीएल २०२२मधील आरसीबीचा संपूर्ण संघ

आरसीबी संघाने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना मेगा लिलावापूर्वीच रिटेन केलं आहे. विराट कोहलीला १५ कोटी, मॅक्सवेलला ११ कोटी आणि सिराजला ७ कोटींमध्ये संघात स्थान देण्यात आलंय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून महिपाल लोमरोर, फिन एॅलन, शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चामा मिलिंद, अनीश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, सिद्धार्थ कौल, लवनित सिसोदिया, फाफ डू प्लेसीस, हर्षल पटेल, वानिंडू हसारंगा, दिनेश कार्तिक, जोश हेजलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत आणि आकाशदीप यांना लिलावात विकत घेण्यात आलं आहे.


हेही वाचा : Weather alert: राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट जारी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -