घरताज्या घडामोडीमाझ्यासारखे कुठल्याही सुरक्षेविना महाराष्ट्रात फिरुन दाखवा, पडळकरांचे संजय राऊतांना थेट आव्हान

माझ्यासारखे कुठल्याही सुरक्षेविना महाराष्ट्रात फिरुन दाखवा, पडळकरांचे संजय राऊतांना थेट आव्हान

Subscribe

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला एमआयएमकडून प्रस्ताव आल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. काश्मीर फाईल्स चित्रपटावरुनही राज्यात राजकीय वादंग सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींनी पाकव्याप्त काश्मीर भारतात जोडणार असल्याचे आश्वासन दिले होते. मोदी पुन्हा कधी जोडणार असा खोचक सवाल राऊतांनी केला होता.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कोणतीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरुन दाखवावे असं थेट चॅलेंज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताशी कधी जोडणार? जे वीर सावरकरांचे स्वप्न होते ते आम्हाला पाहता येईल असे राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरुन दाखवा म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल. असे गोपीचंद पडळकर म्हणाले. जनाब राऊत तुमच्या माहिती करीता जेव्हा लाल चौकात पाक आंतकवाद्यांनी..कोई मा का लाल तिरंगा लहराके दिखाये अशा धमक्या देण्याचे पोस्टर्स लावले होते. त्यावेळेस नरेंद्र मोदींनी धमक्यांना न जुमानता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता. जनाब राऊत अजूनही उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय. यावर कधीतरी एखादा लेख लिहा असे आवाहनसुद्धा पडळकर यांनी राऊतांना केले आहे.

अदित्य ठाकरेंचा फज्जा उडवला

राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांना उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या विधान सभा निवडणुकीसाठी मैदानात उतरवले होते. आदित्य ठाकरे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये सभा घेतल्या होत्या परंतु दोन्ही राज्यात शिवसेनेला नोटापेक्षा कमी मत मिळाली आहेत. यावरुन पडळकरांनी निशाणा साधला आहे. जनाब संजय राऊत तुम्हाला उत्तरप्रेदश व गोवा येथील निवडणूकीत नोटा पेक्षाही कमी मत मिळाले आणि आदित्य ठाकरे यांना देशपातळीवर लाँच करून त्यांचा पार फज्जा उडविला. कदाचित ज्या पद्धतीने काकांनी राहुल गांधींना टोपन नाव मिळवून दिले. तशीच काही तुमची सुप्त इच्छा आदित्य ठाकरेंबाबत दिसत असल्याचे पडळकर म्हणाले आहेत.

- Advertisement -


हेही वाचा : Weather Alert : राज्यासाठी पुढील 12 तास महत्त्वाचे; मुंबई, पुण्यासह अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता: IMD

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -