घरमहाराष्ट्रआरोप करणं ही विरोधकांची सवयच; महाराष्ट्र कधीही झुकणार नाही - आदित्य ठाकरे

आरोप करणं ही विरोधकांची सवयच; महाराष्ट्र कधीही झुकणार नाही – आदित्य ठाकरे

Subscribe

''आजचं मुख्यमंत्र्यांचे भाषण होतं त्यातील प्रत्येक शब्द हा महत्वाचं आहे. देशाची परिस्थिती काय आहे, कशी अघोषित आणीबाणी आहे आणि महाराष्ट्रात जे काम करत आहोत. याच्यावरती एकदम परखडपणे आणि स्पष्टपणे आज बोललेले आहेत'', असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदन करताना विरोधकांच्या सर्व आरोपांना उत्तर दिलं आहे. विधानसभेतील उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ”आरोप करण्याची विरोधकांना सवयच आहे. विरोधकांच्या आरोपांची चिरफाड मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्र कधीही झुकणार नाही”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

विधानसभेतून बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलतना मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ”आजचं मुख्यमंत्र्यांचे भाषण होतं त्यातील प्रत्येक शब्द हा महत्वाचं आहे. देशाची परिस्थिती काय आहे, कशी अघोषित आणीबाणी आहे आणि महाराष्ट्रात जे काम करत आहोत. याच्यावरती एकदम परखडपणे आणि स्पष्टपणे आज बोललेले आहेत”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

- Advertisement -

”आपण बगितलं असेल या महाराष्ट्रात जे काही चाललं आहे. इतर राज्यांमध्ये चालल आहे जिथे भाजपची सत्ता नाही आहे तिथं धमकवणं, केंद्रीय यंत्रणा वापरणं हे सुरूच असतं. आज तुम्ही बघितलंच असेल मुख्यमंत्र्यांनी आज जे शब्द वापरले, एकंदरीत परखडपणे मत माडलं आहे”, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं

”आम्ही आधीच सांगितलं आहे, महारष्ट्र कधी झुकणार नाही, आम्ही लढा देत राहू, आम्ही नेहमीत सत्याच्यासोबत राहू. विरोधकांचे आरोप हे असतातच. सकाळी उठल्या-उठल्या त्यांची सवयच आहे आरोप करायची. आम्ही लक्ष देत नाही. जनात आमच्यासोबत आहे. आम्ही काम करत असतो आणि काम करत राहू”, असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यपालांचा विधानसभेत एवढा अपमान… ; मुख्यमंत्र्यांचा भाजपवर जोरदार हल्ला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -