घरदेश-विदेश१ एप्रिलपासून औषधांच्या किंमतीत होणार वाढ

१ एप्रिलपासून औषधांच्या किंमतीत होणार वाढ

Subscribe

महागाईचा भडका अजूनही कायम आहे. इंधन दरवाढीनंतर आता जीवनावश्यक ८०० औषधांच्या किंमती वाढणार आहेत. १ एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांच्या किमती १०.७ टक्क्यांनी वाढणार आहेत.

महागाईचा भडका अजूनही कायम आहे. इंधन दरवाढीनंतर आता जीवनावश्यक ८०० औषधांच्या किंमती वाढणार आहेत. १ एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांच्या किमती १०.७ टक्क्यांनी वाढणार आहेत. औषधांच्या किंमती वाढणार असल्यानं याचा थेट फटका रुग्णांनाही बसणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

जागतिक महागाई आणि रशिया-युक्रेन युद्धामुळं आपल्या देशातही महागाई वाढू लागलीय. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींदरम्यान आता औषधांच्या किमतीही वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी-व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारनं शेड्यूल्ड औषधांसाठी १० टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची परवानगी दिली आहे.

- Advertisement -

उच्च रक्तदाब, ताप, हृदयरोग, त्वचा रोगाच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी औषधं महागणार आहेत. वेदनाशामक आणि एँटी बायोटिक फिनायटोईन सोडियम, मेट्रोनिडाझोलसारखी आवश्यक औषधांवरही परिणाम होणार आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. घाऊक महागाई दरात वाढ झाल्यानं औषधांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचं नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथरिटीनं (एनपीपीए) स्पष्ट केलं आहे.

औषधांच्या किमती वाढवल्या जाव्यात अशी मागणी कोरोना संकट आल्यापासून या क्षेत्रातील कंपन्या करत होत्या. अखेर एनपीपीएनं औषधांचे दर १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आवश्यक औषधांच्या किमती वाढतील. कोरोनाची मध्यम ते गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचे दरही वाढणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Petrol-Diesel Price Today: तेलाचे दर आऊट ऑफ कंट्रोल; आजही पेट्रोल-डिझेल महागले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -