घरताज्या घडामोडीSunday Streets : मुंबई पोलिसांची 'संडेस्ट्रीट' संकल्पना, मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी संजय पांडेंचा...

Sunday Streets : मुंबई पोलिसांची ‘संडेस्ट्रीट’ संकल्पना, मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी संजय पांडेंचा मोठा निर्णय

Subscribe

मुंबईकरांना तणावमुक्त वातावरणामध्ये वावरता यावे. तसेच मुंबईकरांना रस्त्यावर येऊन मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलिंग आणि सांस्कृतिक खेळ यांसारखे कार्यक्रम करता यावेत, यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

दैनंदिन त्रासातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी संडेस्ट्रीट ही संकल्पना मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आणि मुंबई महापालिका यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणार आहे. उद्या (रविवार) २७ मार्चपासून सहा ते दहा या वेळेत संडेस्ट्रीटला सुरुवात होणार आहे. मुंबईतील निवडक सहा रस्ते हे फक्त मुंबईकरांसाठी असणार आहेत. त्या वेळेत त्या रस्त्यांवर कोणतेही वाहन नसणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना रस्त्यावर चालता, धावता येणार आहे. तसेच व्यायाम आणि योगा सुद्धा करता येणार आहे.

- Advertisement -

संडेस्ट्रीटसाठी या सहा रस्त्यांची निवड

मुंबईतील सहा रस्त्यांवर पोलिसांनी वाहतुकबंदी केली आहे. यामध्ये मरीन ड्राईव्ह-दोराभाई टाटा रोड नरीमन पॉइंट, वांद्रे-कार्टर रोड, गोरेगाव-माईंड स्पेसमागील रस्ता, डी.एन.नगर-लोखंडवाला मार्ग, मुलुंड-तानसा पाईपलाईन, विक्रोळी-पूर्व द्रुतगती महामार्ग-विक्रोळी ब्रिज या रस्त्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

१) मरिन ड्राईव्ह – दोराभाई टाटा रोड, नरिमन पॉईंट – मुरली देवरा चौकापासून ते एनसीपीएपर्यंत पर्यायी मार्ग- १.७ किमी

२) वांद्रे – कार्टर रोड – ओटर्स क्लबपासून ते सीसीडीपर्यंत पर्यायी मार्ग – २ किमी लांब, ३० मीटर रुंद

३) गोरेगाव – माईंट स्पेसमागील रस्ता – इलेक्ट्रिक पोल क्र चीसीयू ०८५/०१८ जिम्मी योगीराज मार्गाजवळ – ५०० मीटर लांब, ६० फूट रुंद

४) दा. नौ. नगर – लोखंडवाला मार्ग – समर्थनगर म्हाडा टॉवर्स ते जॉगर्स पार्क पर्यायी मार्ग -६०० मीटर लांब ३० फूट रुंद

५) मुलुंड – तानसा पाईपलाईन – मुलुंड गोरेगाव लिंक रोड, तानसा पाईपलाईन ते विना नगर पर्यायी मार्ग – २.५ किमी लांब, ४ मीटर रुंद

६) विक्रोळी – इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, विक्रोळी ब्रीज – सर्विस रोड ऑफ विक्रोळी ब्रिज, दक्षिण वाहिनी ते घाटकोपर ब्रिज सिग्नल पर्यायी मार्ग – २.५ किमी लांब ते १४ मीटर रुंद

संन्डस्ट्रीट कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना हे करण्यास मनाई

संन्डस्ट्रीट कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना व्यावसायिक जाहिरात, ध्वनिक्षेपक वापरणे, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम, धुम्रपान, मद्य प्राशन आणि कचरा टाकण्यास मनाई असणार आहे.


हेही वाचा : यशवंत जाधव गैरव्यवहार प्रकरणी इक्बाल सिंग चहल यांचीही चौकशी करा, मोहित कंबोज यांची मागणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -