घरदेश-विदेशपंजाबच्या जनतेला घरपोच मिळणार 'रेशन'; भगवंत मान सरकारचा मोठा निर्णय

पंजाबच्या जनतेला घरपोच मिळणार ‘रेशन’; भगवंत मान सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

पंजाबमध्ये 'आप'च्या सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री भगवंत मान हे एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. अशातच आत भगवंत मान यांनी सोमवारी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली. दिल्लीच्या धर्तीवर पंजाबमध्येही त्यांनी घरोघरी शिधा पोहोचवण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, सरकार आता रेशन घरोघरी पोहोचवणार आहे.

दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (AAP) सीमोल्लंघन करत पंजाबमध्ये विजय मिळवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पंजाबच्या जनतेनं ‘आप’च्या पदरात घवघवीत यश टाकलं. पंजाबमध्ये ‘आप’च्या सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री भगवंत मान हे एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. अशातच आत भगवंत मान यांनी सोमवारी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली. दिल्लीच्या धर्तीवर पंजाबमध्येही त्यांनी घरोघरी शिधा पोहोचवण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, सरकार आता रेशन घरोघरी पोहोचवणार आहे.

”रेशन घरोघरी पोहोचवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, ही योजना पर्याय म्हणून राहणार आहे. आमचे अधिकारी कॉल करतील आणि राशन घरपोच करण्याची वेळ विचारतील. त्याचवेळी रेशनचे वितरण केले जाईल”, असं भगवंत मान यांनी म्हटलं.

- Advertisement -

सत्तेत आल्यापासून भगवंत मान एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. याआधी शुक्रवारी भगवंत मान यांनी आमदारांच्या पेन्शनमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा केली होती. मान यांच्या म्हणण्यानुसार, आतापासून आमदारांना एकदाच पेन्शन मिळणार आहे. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी आमदार झाल्यावर पेन्शनची रक्कम जोडली जायची. इतकंच नाही तर आमदाराच्या कुटुंबीयांना मिळणारी पेन्शनही कमी करण्याची घोषणा मान यांनी केली होती. या निर्णयामुळे जे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत ते गरीब कल्याणासाठी वापरणार असल्याचे मान म्हणाले होते.

- Advertisement -

दरम्यान, रेशन घरोघरी पोहोचवण्याची ही योजना पंजाबमध्ये लागू करण्याच्या आगोदर दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सुरू केली होती. या योजनेवरून केंद्र सरकार आणि केजरीवाल यांच्यात वादाविवाद सुरू होते. तसंच, त्यावेळी हा वाद न्यायालयापर्यंत गेला होता. त्यामुळं आता ही योजना पंजाबमध्ये सुरू होणार असून, पंजाबची जनाता याला कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भगवंत मान यांच्या मोठ्या घोषणा केल्या

  • पंजाबमधील मंत्रिमंडळ विस्तारानंतरच्या पहिल्या बैठकीत भगवंत मान यांनी सरकारी विभागांमधील २५ हजार रिक्त पदे काढण्याची घोषणा केली होती.
  • पंजाबमध्ये दरवर्षी २३ मार्चला भगतसिंग यांच्या पुण्यतिथीला सुट्टी जाहीर केली जाते.
  • एवढेच नाही तर पंजाब विधानसभा संकुलात डॉ. भीमराव आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे पुतळे बसवण्याची घोषणा केली.
  • पंजाबमध्ये ३५००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येणार आहे.
  • पंजाबमध्ये लाच मागणाऱ्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या तक्रारींसाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 9501 200 200 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

हेही वाचा – मातोश्रीला वाचवण्यासाठी स्वतःच्या आईचं नाव द्यावं, वाईट वाटते, सोमय्यांचा जाधवांवर प्रहार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -