घरदेश-विदेश“प्रधानमंत्री की Daily To-Do List…”, राहुल गांधींचा ट्विटरवर नरेंद्र मोदींना टोला

“प्रधानमंत्री की Daily To-Do List…”, राहुल गांधींचा ट्विटरवर नरेंद्र मोदींना टोला

Subscribe

खाद्यपदार्थ आणि वस्तुंचे सततचे वाढते दर आणि वाढती महागाई यावरून काँग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ''पंतप्रधानांची दररोजची टु-डू लिस्ट'' असं लिहीत खोचक टीका केली आहे.

खाद्यपदार्थ आणि वस्तुंचे सततचे वाढते दर आणि वाढती महागाई यावरून काँग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ”पंतप्रधानांची दररोजची टु-डू लिस्ट” असं लिहीत खोचक टीका केली आहे. राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीका केली आहे. शिवाय, आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी मन की बातच्या पार्श्वभूमीवर #RozSubahKiBaat असं देखील खाली म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेला आता भाजपाकडून कसे प्रत्युत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी ट्विटरवर मोदींची टू-डू लिस्ट शेअर केली असून, त्यात देशातील चर्चेत असलेल्या मुद्द्यांवरून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांच्या टू-डू लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर पेट्रोल-डिझेलच असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. “पेट्रोल-डिझेल-गॅसच्या किमती किती वाढवू”, असं राहुल गांधींनी शेअर केलेल्या लिस्टमध्ये लिहिलं आहे.

- Advertisement -

 “पंतप्रधानांची रोजची टू-डू लिस्ट

पेट्रोल-डिझेल-गॅसच्या किमती किती वाढवू…
लोकांची खर्चावर चर्चा कशी थांबवू…
तरुणांना रोजगाराची खोटी स्वप्न कशी दाखवू
आज कोणती सरकारी कंपनी विकू
शेतकऱ्यांना अजून लाचार कसं करू…”

- Advertisement -

भाजपा आणि काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांमध्ये कायमच आरोप-प्रत्यारोप आणि टीका होताना दिसत आहेत. केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून भाजपावर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधण्यात येतो. यामध्ये अनेकदा खोचक टीकेचा देखील समावेस असतो.


हेही वाचा – सर्वांनी एकत्र बसून ‘यूपीए’ची दिशा ठरवण्याची गरज – जयंत पाटील

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -