Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश income tax notice : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या पत्नी आणि...

income tax notice : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या पत्नी आणि मुलाला आयकर विभागाची नोटीस

Subscribe

देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. आयकर विभागाने देवेगौडा यांच्या पत्नीसह मुलगा रेवन्ना यांनाही नोटीस पाठवली आहे. आयकर विभागाच्या या नोटीसमुळे आता कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. देवेगौडा यांचे पुत्र आणि कर्नाटकचे माजी मंत्री एचडी रेवन्ना यांनी ही माहिती दिली आहे. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांच्या विरोधात प्रॉपर्टीशी संबंधित एका प्रकरणात ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

आयकर विभागाने बजावलेल्या नोटीसबाबत पत्रकारांशी बोलताना रेवन्ना म्हणाल्या की, आयकर विभागाला आम्हाला नोटीस पाठवू द्या, आता ते माझ्या आईलाही नोटीस पाठवत आहेत. आम्ही आमच्या शेतात ऊस पिकवतो. त्यांनी येऊन पाहावे आणि सर्वेक्षण करावे. यातून माझ्या- आई वडिलांनी कोट्यावधी रुपये कमावले का? आम्ही नवीन मालमत्ता खरेदी केली का? केवळ एकाच राजकीय पक्षाला का टार्गेट केले जात आहे? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले.

- Advertisement -

रेवन्ना पुढे म्हणाले की, माझ्या आईच्या नावे तिच्या कुटुंबाची दोडापुरा आणि पुदुवलाहिप्पी येथे जमीन आहे म्हणून नोटीस पाठवण्यात आली का? माझ्या आईला नोटीस पाठवून आमच्या मालमत्तेबाबत विचारणा केली आहे. याला आम्ही कायद्यानुसार उत्तर देऊ… रेवन्ना यांचे भाऊ एचडी कुमारस्वामी म्हणाले की, कुटुंब राजकीय शस्त्र म्हणून या नोटीसचा वापर करणार नाही. आमचे कुटुंब नेहमीच पारदर्शक राहिले आहे, त्यामुळे आम्हाला आयकर विभागाच्या नोटिसांची चिंता करण्याची गरज नाही. जे काही उत्तर द्यावे लागेल ते आम्ही नोटीसच्या उत्तरात देऊ.

माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (एस)चे सेकंड-इन-कमांड एचडी कुमारस्वामी यांनी देखील आयकर विभागाच्या नोटीसीवर नाराजी व्यक्त केली आहे.


रशिया-यूक्रेन संकटात भारताच्या भूमिकेवरून थरुर यांचे मोठं विधान; म्हणाले…


- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -