घरक्रीडाRashid Khan IPL 2022: फिरकीपटू राशिद खानने हॉटेलमध्ये बनवली अफगाण चिकन करी,...

Rashid Khan IPL 2022: फिरकीपटू राशिद खानने हॉटेलमध्ये बनवली अफगाण चिकन करी, Video व्हायरल

Subscribe

अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर राशिद खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. फिरकीपटू राशिद खानने हॉटेलमध्ये अफगान चिकन करी बनवली आहे. तसेच त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यंदाच्या हंगामात राशिद खान गुजरात टायटन्सकडून खेळत आहे.

राशिद खानच्या कुकिंगचे कौशल्य चाहत्यांना खूप आवडले आहे. या व्हिडिओमध्ये तो संध्याकाळच्या जेवणासाठी अफगाणी चिकन करी तयार करत आहे. रमजान महिन्यात आणि सूर्यास्ताच्या दिवशी उपवास सोडण्यासाठी अशा प्रकारची मेजवानी बनवली जाते. ट्विटरवर पोस्ट शेअर करताना राशिद खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, अफ्तारीसाठी अफगाणी चिकन करी बनवत आहे.

- Advertisement -

राशिद खान आणि त्याचा संघ गुजरात टायटन्स उद्या शुक्रवारी, ८ एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध लढणार आहेत. राशिद खान या हंगामात आपल्या संघाकडून दोनदा खेळला असून त्याने दोन गडी बाद केले आहेत. राशिद खानला आयपीएलमध्ये २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये १५ कोटी रूपयांत लिलाव करण्यात आला आहे.

- Advertisement -

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -