घरमहाराष्ट्र'नोटबंदीतून मोदींनी उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा केला'

‘नोटबंदीतून मोदींनी उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा केला’

Subscribe

रिझव्‍‌र्ह बँकेचे निकष धाब्यावर बसवून केलेल्या या नोटबंदीने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला', अशी गंभीर टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर केली.

‘नोटबंदीतून पंतप्रधान मोदी यांनी उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा केला. रिझव्‍‌र्ह बँकेचे निकष धाब्यावर बसवून केलेल्या या नोटबंदीने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला’, अशी गंभीर टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर केली. दरम्यान, नोटबंदीनंतर सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली. याशिवाय राफेल विमान खरेदी घोटाळा, हरेन पांडे मृत्यू प्रकरणाशी संबंधितांचा झालेला गूढ मृत्यू  अशा प्रकरणांमध्ये उच्चस्तरीय चौकशीची मागणीही त्यांनी केली. कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारपरिषदेदरम्यान चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारकडून सीबीआय, न्यायव्यवस्था आणि रिझव्‍‌र्ह बँकेवर  दडपशाही केली जात आहे असा आपला स्पष्ट आरोप आहे. केंद्र सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्यामुळे त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे साडेतीन लाख कोटी रुपयांची मागणी केली आहे. पहिल्यांदाच कलम ७ चा वापर करुन ही मागणी करण्यात आली असल्यामुळे केंद्र सरकारची वाटचाल दडपशाही आणि आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेने असल्याचंही, चव्हाण यावेळी म्हणाले.


वाचा सविस्तर: भाजपचे आमदार अनिल गोटे यांचा भाजपच्याच सभेत राडा!

घोटाळ्यांमध्ये मोदी स्वत:च अडकत चालले आहेत

राफेल विमान घोटाळ्याची अधिक चौकशी होऊ नये म्हणून मोदी सरकारने कारस्थान करुन, सुप्रीम कोर्टाची नेतृत्वाला काढून टाकले, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ‘सीबीसी’ (मुख्य सतर्कतेचा आयोग) देखील यामध्ये सामील आहे आणि भाजपने सीबीआयचे आरोप असलेल्या आपल्या हस्तकालाच सीबीआयच्या संचालक मंडळावर नेऊन बसवले आहे. मात्र, याप्रकरणी काँग्रेसने सुपीम कोर्टामध्ये धाव घेतली असून या दडपशाहीची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली. नोटबंदी करतेवेळी आरबीआयचे निकष धाब्यावर बसवले. तसंच राफेल घोटाळ्याची चौकशी करु नये यासाठी सीबाआयची सगळी लीडरशीपही बदलून टाकली. त्यामुळे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, की नोटबंदी किंवा राफेन विमान खरेदीचा निर्णय आणि त्यातील निर्णयप्रक्रिया यामध्ये जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपतींच्या खिशात घालण्याचा प्रकार घडला. ज्याप्रणाणे बुडत्याचा पाय खोलात जातो, त्याचप्रमाणे आता मोदी स्वत:च अडकत चालले आहेत. राफेल विमान खरेदी घोटाळय़ातून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर पडतील असं मला वाटत नसल्याचे मत, चव्हाण यांनी व्यक्त केले. तसंच हरेन पांड्याच्या खुनानंतर एकापाठोपाठ होणाऱ्या गूढ मृत्यूंची उच्चस्तरीय पातळीवर सखोल चौकशी करावी, असंही चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -