घरठाणेठाण्यात कंटेनर केबिनला भीषण आग, घरगुती वस्तू जळून खाक

ठाण्यात कंटेनर केबिनला भीषण आग, घरगुती वस्तू जळून खाक

Subscribe

ठाण्यात कंटेनर केबिनला लागलेल्या आगीमध्ये घरगुती वस्तू जळून खाक झाल्या आहेत. रात्रीच्या सुमारास आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली असल्याची माहिती आहे.

ठाण्यातील ओवळा, घोडबंदर रोड, वेलवेट गार्डन येथील लोखंडी कंटेनर कॅबिनला आग लागल्याची घटना सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेत कंटेनर केबिनमधील घरगुती वस्तू जळून खाक झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

- Advertisement -

ओवळा येथील सिद्धार्थ यांच्या मालकीच्या लोखंडी कंटेनरला आग लागल्याची घटना मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ही आग अंदाजे अर्धा तासांनी आटोक्यात आली. या घटनेत, कोणलाही दुखापत झाली नसली तरी त्या कंटेनरमधील घरगुती वापराचे असलेले साहित्य गॅस सिलिंडर, रेफ्रिजरेटर, कपडे, बिल बुक, गॅस शेगडी, लाईट पॅनल इत्यादी वस्तू अक्षरशः जळून खाक झाल्या आहेत. यावेळी, १- फायर वाहन आणि १- रेस्क्यू वाहन पाचारण केले होते अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.


हेही वाचा : Weather Update : उकाड्यापासून सुटका नाहीच; दिल्लीसह ‘या’ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -