घरटेक-वेकIndia Post Office : भारतीय टपाल खात्याच्या नावाने फसवणूक? वेळीच व्हा सावध

India Post Office : भारतीय टपाल खात्याच्या नावाने फसवणूक? वेळीच व्हा सावध

Subscribe

इंडिया पोस्ट सेवा (India Post Office) वापरणाऱ्या लोकांनी वेळीच सतर्क होण्याची गरज आहे. कारण इंडिया पोस्ट सेवा खात्याच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नावाचे वापर करुन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील फसवी जाहिराती देखील व्हायरल होत आहे. या जाहिरातीत दावा केला जातोय की, इंडिया पोस्ट  लकी ड्रॉमधून पैसे देत आहे.

मात्र इंडिया पोस्ट विभागाने असा कोणताही उपक्रम सुरु केला नसून लोकांनी सतर्क राहावे असे म्हटले आहे. लोकांना व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ई-मेल आणि मेसेजवर याप्रकारचे मेसेज येत आहेत. या मेसेजमध्ये एक लिंक दिली असून त्यात इंडिया पोस्ट विभाग वापरकर्त्यांना अनुदान, बोनस देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

- Advertisement -

परंतु इंडिया पोस्ट विभागाकडून असा कोणताही मेसेज पाठवण्यात आला नसून लोकांना विनंती करण्यात आली की, लोकांनी जन्मतारीख, खाते क्रमांक, मोबाईल नंबर, जन्म ठिकाण किंवा OTP सारखी माहिती अजिबात शेअर करु नये.

- Advertisement -

अशा लिंक्सद्वारे वैयक्तिक माहिती शेअर केल्याने नुकसान होऊ शकते. पीआयबीच्या तथ्य तपासणी विभागानेही अशा मेसेजला बनावट असल्याचे म्हटले आहे.

http://adoptiondiscern.top/indiapost/tb.php?ruyofamp1650528224386 या बनावट वेबसाईटद्वारे  इंडिया पोस्टवर लकी ड्रॉ काढल्याचा दावा खोटा असल्याचे टपाल विभागाने स्पष्ट केलेय. भारतीय टपाल विभागाचा अशा उपक्रमाशी काहीही संबंध नाही. अशा फसव्या कारवायांपासून सावध रहा, असं आवाहन टपाल विभागाने केलं आहे.


Elon Musk Twitter News : एलन मस्क ट्विटरचे नवे मालक; युजर्समध्ये निराशा, अनेकांनी डिलीट केले अकाऊंट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -