घरताज्या घडामोडीMahinda Rajapaksa Resigns: श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

Mahinda Rajapaksa Resigns: श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

Subscribe

श्रीलंकेत महागाईचा कहर सुरू असल्यामुळे श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. देशात गंभीर होत चाललेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आज अखेर महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे.

महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा देण्यापू्र्वी एक ट्विट केलं होतं की, मी सामान्य जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन करतो आणि लक्षात ठेवा की हिंसेने फक्त हिंसाचार वाढेल. आर्थिक संकटातून आपल्याला समाधानाची गरज आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध आहे.

- Advertisement -

राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक देखील पार पडली. विशेष मंत्रिमंडळ, महिंदा राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच पुढील आठवड्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचं देखील सांगितलं जात होतं.

- Advertisement -

देशातील हिंसाचाराच्या घटनांदरम्यान राजपक्षे यांनी एक वक्तव्य केलं आहे. ज्यामध्ये किमान १६ लोकं जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या समर्थकांनी त्याच्या निवासस्थानाजवळ जमलेल्या सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केला होता. त्यानंतर शहरामध्ये पोलिसांकडून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.


हेही वाचा : Bulldozer in Shaheen Bagh: दिल्लीच्या शाहीन बागमधील बुलडोझरच्या कारवाईवर स्थानिकांचा संताप; प्रकरण कोर्टात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -