घरक्रीडाLSG vs RCB : रजत पाटीदारची शतकीय खेळी, लखनौ संघासमोर २०८ धावांचे...

LSG vs RCB : रजत पाटीदारची शतकीय खेळी, लखनौ संघासमोर २०८ धावांचे आव्हान

Subscribe

क्वालिफायरनंतर (Qualifier) आज एलिमेनेटरचा (Eliminator) सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू (LSG vs RCB ) यांच्यात होत आहे. बंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदारने (Rajat Patidar) शतकीय खेळी केली आहे. आरसीबीने (RCB ) निर्धारित २० ओव्हर्समध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात २०७ धावा केल्या आहेत. तसेच दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) सुद्धा उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. लखनौला (LSG) विजयासाठी २० ओव्हर्समध्ये २०८ धावांचे आव्हान देण्यात आले आहे.

एलिमेनेटर सामन्यात पराभूत होणारा संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. तर विजेता संघ क्वालिफायर २ मध्ये राजस्थानसोबत भिडणार आहे. प्रथम फंलदाजी करणाऱ्या आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार फाफ डु प्लेसिसची गोल्डन डकने विकेट घेतली. विराट कोहलीने २४ चेंडूत २५ धावांची खेळी केली. विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ चेंडूत ६६ धावांची भागिदारी केली.

- Advertisement -

एलिमेनटर सामन्यात रजत पाटीदारने वादळी खेळी करत शतक झळकावले आहे. याच सामन्यात पाऊस देखील पडला होता. प्लेऑफच्या सामन्यात शतक झळकावणारा रजत पाटीदार पहिला अनकॅप खेळाडू आहे. रजत पाटीदारने सात षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने ११२ धावांची खेळी केली.

रजत पाटीदार आणि अनुभवी दिनेश कार्तिकने विस्फोटक फलंदाजी केली. त्यांनी अखेरच्या तीस चेंडूत ८० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी पाचव्या विकेटसाठी ४१ चेंडूत ९२ धावांची भागिदारी केली. मोहसीन खानने चार ओव्हर्स मध्ये २५ धावा देत एक विकेट घेतली.

- Advertisement -

दरम्यान, टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पाचव्या स्थानी पोहोचला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम वेस्ट विंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. तर भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत पाच शतकं आणि ७८ अर्धशतकं झळकावली आहेत.


हेही वाचा : उमरान भारतीय संघासाठी दीर्घकाळ खेळेल; सौरव गांगुलीकडून मलिकचे कौतुक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -