घरदेश-विदेशAjmer Dargah Controversy आता अजमेर शरीफ दर्ग्यातही शिव मंदिर असल्याचा दावा; परिसरातील...

Ajmer Dargah Controversy आता अजमेर शरीफ दर्ग्यातही शिव मंदिर असल्याचा दावा; परिसरातील बंदोबस्तात वाढ

Subscribe

जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकारी दर्ग्यात पोहचले. प्रकरणाची संवेदनशीलता पाहता दर्ग्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ज्ञानवापी मशिदीत  (Ajmer dargah controversy) शिवलिंग सापडल्याच्या दाव्यावरून आता देशात नव्या वादाला सुरुवात झाली आहे, या वादाचे ढग आता अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गापर्यंत पोहोचले आहे. दिल्लीस्थित महाराणा प्रताप सेनेने या दर्ग्यात हिंदू शिवमंदिर असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे गुरुवारी या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकारी दर्ग्यात (Ajmer dargah) पोहचले. प्रकरणाची संवेदनशीलता पाहता दर्ग्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाराणा प्रताप सेनेने (Maharana Pratap Army)  ट्विट करत, सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यामध्ये हिंदू चिन्ह असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ख्वाजा साहिब यांच्या दर्ग्याच्या जागेवर पूर्वी शिवमंदिर होते असाही दावा संघटनेने केले आहे. दरम्यान प्रताप सेनेने एक फोटोही जारी करत हा फोटो दर्ग्याच्या खिडक्यांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या खिडक्यांवर स्वस्तिकाच्या खुणा आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि केंद्रातील मोदी सरकारला पत्रही लिहून चौकशी करण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

दर्ग्याच्या सुरक्षेसाठी हदी राणी बटालियन तैनात आहे. मात्र संवेदनशील बाब असल्याने प्रशासनाने तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला. प्रशासकीय व पोलिसांच्या पथकाने दर्गा संकुलाचा आढावा घेतला. लोकांनी शांतता आणि संयम बाळगावा, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

आठवडाभरात या दर्गा परिसराची चौकशी न झाल्यास केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे लष्करप्रमुख परमार यांनी सांगितले. तरीही तोडगा न निघाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल. महाराणा प्रताप सेनेचे कार्यकर्ते 2000 च्या संख्येने अजमेरला जाऊन आंदोलन करणार आहेत. तसेच कोर्टातही जाता येईल.

ज्ञानवापी मशीद प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे वर्ग, नव्या याचिकेवर होणार सुनावणी

दरम्यान अजमेरमध्ये सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती (Hazrat Khwaja Gharib Nawaz Dargah) यांचा जगप्रसिद्ध दर्गा आहे. 11 व्या शतकात ख्वाजा साहिब इराणच्या संजर प्रातांतून अजमेरला आले होते. अजमेरमध्ये राहून त्यांनी प्रार्थना केली होती. दरवर्षी त्यांचा वार्षिक उर्स रजब महिन्यात सहा दिवस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. यात भारतासह विविध देशांतील यात्रेकरू सहभागी होतात. दर्गा संकुलात ख्वाजासाहेबांच्या पत्नीसह अनेकांची कबर आहे.

जगात सुफीवादाची सुरुवात अजमेरपासून झाली असे मानले जाते. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांना सूफी धर्माचे जनक मानले जाते. त्यांच्यानंतर हजरत निजामुद्दीन औलिया, ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्यासह इतर संतांनी सुफी विचारधारा पुढे नेली.


Monsoon Update : केरळमध्ये आज मान्सून दाखल होण्याची शक्यता; राज्यात ‘या’ भागात पावसाच्या सरी, IMD अंदाज काय?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -