“हौसेला मोल नाही!”…..कुत्रा बनण्यासाठी केला तब्बल ११ लाखांचा खर्च

जगात असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या जगावेगळ्या विचित्र हैसेमुळे चर्चेत येतात. आता अशीच एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. जपान मधल्या टोको नावाच्या एका व्यक्तीने तब्बल १-२ नव्हे तर ११ लाखांचा हूबेहूब कुत्र्यासारखा दिसणारा पोशाख बनवून घेतला आहे. खरंतर टोकोला त्याच्या लहानपणापासून कुत्र्यासारखे जीवन जगण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने जपानच्या एका प्रोफेशनल एजेंसीला गाठून स्वतःला एक अल्ट्रा रिअॅलिस्टिक कुत्र्याचा पोशाख तयार करून घेतला. तो पोशाख इतका हूबेहूब तयार करण्यात आला आहे की, तो घातल्यानंतर तो माणूस आहे की कुत्रा हे सुद्धा ओळखू शकत नाही.

कुत्रा बनवण्यासाठी खर्च केले ११ लाख

टोकोला कुत्रा बनवण्याची इतकी हैस होती की, त्याने त्यासाठी तब्बल २ मिलियन जपानी येन म्हणजेच ११ लाख रूपये खर्च केले आहेत. हा पोशाख तयार करण्यासाठी ४० दिवसांचा कालावधी लागला. शिवाय हा पोशाख बनवण्यासाठी खूप मेहनत सुद्धा घ्यावी लागली.

या कारणामुळे टोकोने बनवून घेतला ११ लाखाचा पोशाख
टोकोला जेव्हा विचारण्यात आली की, त्याने कुत्र्याचा हा पोशाख तयार करून घेतला. तेव्हा तो म्हणाला की, त्याला लहानपणापासून कुत्र्यांचे आयुष्य जगण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने हा पोशाख तयार करून घेतला. पोशाख तयार झाल्यानंतर टोकोने तो परिधान केलेले फोटो त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले.