घरमहाराष्ट्रनाशिकदेवळ्यात यंदा वर्षभर निवडणुकांची रणधुमाळी

देवळ्यात यंदा वर्षभर निवडणुकांची रणधुमाळी

Subscribe

जिल्हा परिषद, पंचायत समितीसह ग्रामपंचायत, बाजार समित्यांचा बिगूल वाजणार

देवळा : तालुक्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका उत्साहात झाल्या असल्या तरी आता या चालू वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. शुक्रवार (दि.२७) रोजी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना तयार झाली असून, संबंधित ग्रामसेवक आणि तलाठी यांच्याकडे अंतिम प्रभाग रचना आणि नकाशा पाहण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षणाचा कार्यक्रम लवकरच घोषित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, बाजार समिती व इतरही काही संस्थांच्या निवडणुका असल्याने २०२२ हे निवडणुकीचे वर्ष ठरणार आहे.

मागीलवर्षी कोरोनामुळे निवडणुका घेण्यास मर्यादा पडल्याने देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका थांबल्या आहेत. या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक नियुक्त आहेत. या १३ ग्रामपंचायतींसह नोव्हेंबर मध्ये मुदत संपणाऱ असलेल्या अजून १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने या वर्षात २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे. जुलै २०२१ मध्ये तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली असली तरी कोरोनामुळे निवडणुका झाल्या नाहीत. या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे संकेत मिळू लागल्याने या गावातील राजकीय हालचालींना सुरवात झाली आहे.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्याही निवडणुका रेंगाळल्या आहेत. परंतु आता पुढील चार-महिन्यात याही निवडणुका होणार आहेत. देवळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट व पंचायत समितीचे सहा गण आहेत. त्यात तालुक्यातील या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने यावर्षी पुढील सहा महिने निवडणुकांचा माहोल असणार आहे. त्यामुळे नेते-पुढारी मंडळीने आपापल्या वयुहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यात तालुक्यातील देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूकपण गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्रतीक्षेत आहे.

जुलै २०२१ मध्ये मुदत संपलेल्या व प्रशासक असलेल्या देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायती विजयनगर, पिंपळगाव, खुंटेवाडी, वाखारी, शेरी, रामेश्वर, सुभाषनगर, सावकी, खर्डे, वार्षी, खडकतळे, गुंजाळनगर, कापशी

- Advertisement -

नोव्हेंबरमध्ये मुदत संपणार असणार्‍या ग्रामपंचायती फुलेनगर, वासोळ, भऊर, खामखेडा, मटाणे, विठेवाडी, डोंगरगाव, वाजगाव, कणकापुर, श्रीरामपूर, सटवाईचीवाडी, चिंचवे, दहिवड

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -