घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रछत्रीची घडी करुन ठेवा खिशात; रंगीबेरंगी छत्र्यांनी सजली बाजारपेठ

छत्रीची घडी करुन ठेवा खिशात; रंगीबेरंगी छत्र्यांनी सजली बाजारपेठ

Subscribe

स्विटी गायकवाड | नाशिक

 जून महिना सुरु होताच पावसाळ्याची चाहूल लागते आणि पावसाळा म्हटलं की आपल्याला सर्वात अगोदर आठवते ते म्हणजे छत्री, रेनकोट आणि पावसापासून बचाव करणार्‍या टोप्या. यंदा बाजारात छत्र्यांचे विविध प्रकार दाखल झाले असून, विशेष म्हणजे काही छत्र्यांची घडी करुन आपण अगदी खिशातही ठेवू शकतो. या गोष्टीवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण इतक्या लहान आकाराच्या छत्र्यांना नागरिकांची पसंती लाभली आहे.

- Advertisement -

दिवसेंदिवस छत्रीच्या डिझायनमध्ये बदल होत आहे. तिची साईजही कमी कमी होत आहे. पूर्वीच्या काळ्या रंगाच्या छत्र्यांमध्ये दोन व्यक्ती पावसापासून बचावले जाऊ शकत होते. पण ही छत्री सांभाळणे अवघड जात असल्याने छत्र्यांचा आकार कमी होत गेला. आता तर तो इतका कमी झाला आहे की, पाऊस नसला तर छत्रीची घडी करुन आपण ती सहजपणे खिशात ठेवू शकतो. ‘थ्री फोल्ड’ छत्री असे तिचे नाव असून, बाजारात 200 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. शालीमारच्या बाजारात विविध दुकानांमध्ये अगदी सहजरित्या ती आपल्याला बघायला मिळेल. रंगीबेरंगी छत्र्या बाजारात दाखल झाल्याने आत्तापासून पावसाळ्याची लगबग सुरु झाली आहे.

लहान मुलांचे आकर्षण असलेल्या डोरेमॉन, स्पायडरमॅन, बेनटेन, नोबिता, मोटू पतलू, बार्बी, छोटा भीम, सिंचॅन, निंज्या हातोडी, पेपा पिग अशा विविध प्रकारच्या कार्टुनची चित्र असलेले रेनकोटची सध्या धूम सुरु आहे. या रेनकोटची किंमत 170 ते 350 रुपयांपर्यंत आहे. रेनकोट प्लास्टिक आणि कापडी (नायलॉन) या दोन प्रकारात मिळतात. प्लास्टिक ड्रेस 180 रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहेत. तर नायलॉन ड्रेसची किंमत 300 रुपयांपासून सुरु होते. पुरुषांच्या रेनकोटची किंमत 230 ते 800 रुपयांपर्यंत आहे.

- Advertisement -

15 टक्के दर वाढले

छत्री, रेनकोटच्या दरात यंदा 15 टक्के वाढ झाली आहे. दोन वर्षांच्या तुलनेत ही दरवाढ झालेली दिसते. साध्या छत्रीची किंमत 150 रुपये आहे. तर रेनकोटची किंमत 300 रुपयांपासून सुरु होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -