घरमहाराष्ट्रराज्यातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बढत्या आणि बदल्या

राज्यातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बढत्या आणि बदल्या

Subscribe

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या पाच आयपीएस अधिकार्‍यांना बढत्या तर इतर पाच अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात महेश पाटील यांची ठाणे ग्रामीण येथून मुंबई शहरात बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर वाहतूक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ठाण्याचे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ए. डी कुंभारे यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त संरक्षण आणि सुरक्षा विभाग, ठाण्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त पंजाबराव उगले यांची ठाणे प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, पालघरचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांची ठाणे पूर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस उपायुक्त महेश पाटील यांची मुंबईच्या वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुण्याचे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची ठाणे शहर प्रशासन विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली तर पोलीस उपायुक्त अक्षय अशोक शिंदे (नागपूर शहर-जालना), अतुल कुलकर्णी (चंद्रपूर-उस्मानाबाद), नंदकुमार ठाकूर (नांदेड-बीड), बाळासाहेब पाटील (ठाणे-पालघर), राजेंद्र माने यांची मुंबईतून सोलापूर शहरात बदली करण्यात आली आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -